डॉक्टरांच्या अखंड सेवाकार्यामुळेच रुग्णांना जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:25 IST2021-04-30T04:25:32+5:302021-04-30T04:25:32+5:30
कोरोनाच्या महामारीत डॉक्टरांच्या सेवाकार्याचे कौतुक करताना पवार यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, ऑक्सिजनच्या टंचाईमुळे खासगी हॉस्पिटल हतबल झाली ...

डॉक्टरांच्या अखंड सेवाकार्यामुळेच रुग्णांना जीवदान
कोरोनाच्या महामारीत डॉक्टरांच्या सेवाकार्याचे कौतुक करताना पवार यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, ऑक्सिजनच्या टंचाईमुळे खासगी हॉस्पिटल हतबल झाली आहेत. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांच्या नियंत्रणाखाली अहमदनगर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रातील सर्व स्टाफ यांच्यामार्फत नियोजनबद्ध कामकाज सुरूच आहे. त्यांच्यासोबत डॉ. बापूसाहेब कांडेकर, डॉ. दीपक, डॉ. संदीप गाडे, डॉ. सतीश फाटके, डॉ. अक्षयदीप झावरे, डॉ. सतीश सोनवणे, डॉ. सुहास घुले, डॉ. अभिजित पाठक, डॉ. पोपट कर्डिले, बूथ हॉस्पिटल, डॉ. औटी (पारनेर), डॉ. आहेर (टाकळी ढोकेश्वर), डॉ. भाऊसाहेब खिलारी (टाकळी ढोकेश्वर) ही सर्व डॉक्टरमंडळी सतत संपर्कात होते. या डॉक्टरांनी फोनवरून संपर्क साधून कोरोना स्थितीची माहिती दिली. अनेक रुग्णांच्या नातेवाईकांचे ऑक्सिजन उपलब्धतेसाठी मदत करण्यासाठी फोन येतात, त्यावेळी मन हेलावून जाते. अनेक रुग्णांचा फोनवरील कातर स्वरातील आवाज भेदरून टाकणारा होता. अनेक रुग्णांचे नातेवाईक माझ्याकडेही ऑक्सिजनच्या उपलब्धतेसाठी आवाहन करीत होते. २० एप्रिल २०२१ रोजीची ऑक्सिजन संपल्याची ती काळरात्र आठवली की, हृदय पिळवटून जाते. त्यादिवशी ऑक्सिजन उपलब्ध होण्यासाठी पहाटे तीन वाजेपर्यंत विविध मंत्री, अधिकारी यांच्याशी फोनवरून संपर्कात होते.
कोरोना विरुद्धच्या लढाईत सर्व डॉक्टर प्राणपणाने लढत आहेत. जात, धर्म, पद, राजकारणापलीकडे जावून रुग्णसेवा करीत आहेत. त्यांच्या नि:स्वार्थ, अनासक्त सेवेची अहमदनगरच्या वैद्यकीय क्षेत्रात इतिहासात नोंद होईल, असे पवार यांनी पत्रात म्हटले आहे.