पत्नीचा खून करणाऱ्यास जन्मठेप

By Admin | Updated: May 4, 2017 03:55 IST2017-05-04T03:55:51+5:302017-05-04T03:55:51+5:30

अंगावर रॉकेल ओतून पत्नीचा खून करणाऱ्यास जिल्हा न्यायालयाने बुधवारी जन्मठेप व १ हजार रूपयांचा दंड, दंड न

Life imprisonment for wife's murderer | पत्नीचा खून करणाऱ्यास जन्मठेप

पत्नीचा खून करणाऱ्यास जन्मठेप

अहमदनगर : अंगावर रॉकेल ओतून पत्नीचा खून करणाऱ्यास जिल्हा न्यायालयाने बुधवारी जन्मठेप व १ हजार रूपयांचा दंड, दंड न भरल्यास तीन महिने सक्तमजुरी अशी शिक्षा सुनावली़ दत्तात्रय अर्जुन भोसले (वय ३४) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे़
जातेगाव येथे १ जानेवारी २०१५ रोजी आरोपी दत्तात्रय भोसले हा मुलगा आदित्य याला मारहाण करत होता़ त्यावेळी पत्नी सुवर्णा हिने त्यांना अडवून मारहाण करू नका, अशी विनवणी केली. त्यावरुन चिडून दत्तात्रय याने तिच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले़ जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना ३ जानेवारीला सुवर्णाचा मृत्यू झाला़ तिने दिलेल्या मृत्युपूर्व जबाबानुसार दहा साक्षीदार तपासण्यात आले़ पोलीस निरीक्षक आय़आऱ इंगळे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते़ (प्रतिनिधी)

Web Title: Life imprisonment for wife's murderer