शेतकऱ्यांना लुटण्यासाठीच बियाणे कंपन्यांना परवाना
By Admin | Updated: June 10, 2016 23:38 IST2016-06-10T23:31:18+5:302016-06-10T23:38:15+5:30
अहमदनगर: सरकारचे नियंत्रण असलेल्या महाबीज कंपनीने बियाण्यांच्या दरात दरात दुप्पट वाढ केली़ त्यामुळे आता खासगी कंपन्यादेखील बियाण्यांच्या दरात वाढ करतील़

शेतकऱ्यांना लुटण्यासाठीच बियाणे कंपन्यांना परवाना
अहमदनगर: सरकारचे नियंत्रण असलेल्या महाबीज कंपनीने बियाण्यांच्या दरात दरात दुप्पट वाढ केली़ त्यामुळे आता खासगी कंपन्यादेखील बियाण्यांच्या दरात वाढ करतील़ महाबीजची ही दरवाढ म्हणजे एकप्रकारे सरकारने खासगी कंपन्यांना शेतकऱ्यांना लुटण्याचाच परवाना दिला आहे, असा घणाघाती आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी शुक्रवारी येथे केला़
विरोधी पक्षनेते विखे नगर दौऱ्यावर आले असता ते पत्रकारांशी बोलत होेते़ विखे यांनी सरकारच्या कारभारावर सडकून टीका केली़ सततच्या नापिकीमुळे ग्रामीण अर्थकारण कोलमडले आहे़ शेतकरी आधीच आर्थिक अडचणीत असताना महाबीजने बियाण्यांच्या दरात दुप्पट वाढ केली़ एकीकडे मोफत बियाणे देण्याची घोषणा सरकारने केली आहे तर दुसरीकडे बियाण्यांचे भाव वाढविण्यात आले आहे़ स्वत:च्या कंपनीवर सरकारचे नियंत्रण नाही़ ते खासगी कंपन्यांवर काय नियंत्रण ठेवणार, असा सवाल उपस्थित करत खासगी कंपन्यांकडून बियाण्यांच्या नावाखाली लट केली जाईल़ मात्र काँग्रेस हे खपवून घेणार नाही़ सरकारने आठ दिवसांत ही दरवाढ मागे घ्यावी, अन्यथा काँग्रेसच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही विखे यांनी यावेळी दिला़ सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे़ त्यावर कळस असा की एकमेकांना शिव्या घालण्याचा एकमेव कार्यक्रम सध्या सुरू आहे़ एकमेकांचे आई-बाप शोधण्यापेक्षा दोन्ही पक्षांनी सत्तेत राहायचे की नाही, हे ठरवावे़ उध्दव ठाकरे यांनी हे सरकार नालायक असल्याचे विधान केले होते़ मंत्रिमंडळात त्यांचेही मंत्री आहेत़ याचाच अर्थ त्यांचेही मंत्री नालायक आहे़ एवढी वाईट स्थिती असेल तर सत्तेत का थांबता, असा सवाल त्यांनी ठाकरे यांना केला आहे़
विखे उवाच...
-खा पण, संभाळून खा -मुख्यमंत्री, मंत्र्यांना सबुरीचा सल्ला
-घोटाळेबहाद्दरांचे सरकार, विश्वास गमावला
-दोघांच्या भांडणात खडसेंचे पानीपत-
-अश्वासनांचे सरकारकडून घूमजाव
-एकमेकांना शिव्या देण्याचा एकमेव कार्यक्रम
-पदोपदी सरकारचे अपयश दिसते
वेगळा देश केला तर मोदी येतील
-मराठवाड्याचा दौरा करत असताना शेतकऱ्यांनी पंतप्रधान का येत नाही, असा प्रश्न उपस्थित केला़ त्यावर भीषण दुष्काळ सुरू असताना पंतप्रधान विदेशी दौरे करत आहेत़ ते देशात फिरत नाहीत़ मराठवाडा स्वतंत्र देश स्थापन केल्यास पंतप्रधान येतील, अशी टीका त्यावेळी झाली, ती बरोबरच आहे, असेही विखे म्हणाले़