लायसन्सची मुदत संपली, अपॉईंटमेंट घेतलीय का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:15 IST2021-06-10T04:15:14+5:302021-06-10T04:15:14+5:30
नूतनीकरण अथवा लर्निंग लायसन्ससाठी वाहनचालकांना परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अपॉईमेंट घ्यावी लागणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने मागील तीन महिन्यांपासून ...

लायसन्सची मुदत संपली, अपॉईंटमेंट घेतलीय का?
नूतनीकरण अथवा लर्निंग लायसन्ससाठी वाहनचालकांना परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अपॉईमेंट घ्यावी लागणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने मागील तीन महिन्यांपासून लॉकडाऊन होते. त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प होते. या काळात बहुतांश वाहनचालकांच्या परवान्याची मुदत संपली, तर बहुतांश जणांना नवीन परवाना घ्यायचा आहे. अशा परिस्थितीत वाहनचालकांची मोठी गर्दी होऊन कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांनी कामकाजाचे नियोजन करत प्रतिदिन ठराविक कोटा निश्चित केला आहे. ज्यांची अपॉईंटमेंट असेल त्यांनीच कार्यालयात येणे अपेक्षित आहे. येणाऱ्या काळात कोटा वाढवून दिला जाणार आहे.
अशी घ्यावी अपॉईंटमेंट
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने लायसन नूतनीकरणासाठी ऑनलाईन नोंदणीची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन ज्या दिवशी लायसन नोंदणी करण्यासाठी जायचे आहे त्या तारखेवर सिलेक्ट करून मिळालेल्या वेळेत कार्यालयात जाऊन नूतनीकरण करता येणार आहे.
-----------
पहिल्या दोन दिवसांत कोटा पूर्ण
आरटीओ कार्यालयाकडून कोटा निश्चित झाल्यानंतर पहिल्या दोन दिवसांतच वाहनधारकांनी तत्काळ नोंदणी केल्याने हा कोटा पूर्ण झाला. आता पुढील आठवड्यात कोटा निश्चित झाल्यानंतर वाहनधारकांना पुन्हा नोंदणी करता येणार आहे.
--------------------
अनलॉक झाल्यानंतर आरटीओ कार्यालयाचे कामकाज नियमित सुरू झाले आहे. वाहनांच्या संदर्भातील विविध कामांसाठी कार्यालयात होणारी गर्दी लक्षात घेत नियोजन करण्यात आले आहे. परवाना नूतनीकरण व लर्निंग लायसन्ससाठी कोटी निश्चित करण्यात आलेला आहे. त्यामुळे ऑनलाईन अपॉईंटमेंट घेऊनच दिलेल्या तारखेला प्रत्येकाने यावे.
- दीपक पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी
---------
डमी