‘आठवा फेरा घेऊया, स्त्रीजन्माचे स्वागत करूया’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:22 IST2021-08-29T04:22:30+5:302021-08-29T04:22:30+5:30

माजलगाव येथील मनोज कांकरिया यांचे सुपुत्र विपीन आणि कडा येथील रसिकलाल श्रीश्रीमाळ यांची सुकन्या पायल यांचा विवाह नुकताच शिर्डी ...

‘Let’s take the eighth turn, welcome the female birth’ | ‘आठवा फेरा घेऊया, स्त्रीजन्माचे स्वागत करूया’

‘आठवा फेरा घेऊया, स्त्रीजन्माचे स्वागत करूया’

माजलगाव येथील मनोज कांकरिया यांचे सुपुत्र विपीन आणि कडा येथील रसिकलाल श्रीश्रीमाळ यांची सुकन्या पायल यांचा विवाह नुकताच शिर्डी येथे झाला. त्यात डॉ. सुधा कांकरिया यांच्या प्रेरणेने आठवा फेरा स्त्रीजन्माच्या स्वागताचा हा उपक्रम साजरा झाला. लेकाएवढीच लेकही भारी, हाच संदेश घरोघरी, आठवा फेरा घेऊया, स्त्रीजन्माचे स्वागत करूया या मंत्राचे उच्चारण वधू-वरांनी केले. आज मुलगी जन्माला आली नाही तर उद्याची आई निर्माण होणार नाही आणि आई नसेल तर मुलगा किंवा मुलगी दोघांपैकी कोणीही जन्माला येणार नाही. आजही काही समाजात लग्नासाठी मुलीच मिळत नाहीत. सामाजिक असमतोल निर्माण झाला आहे. त्यासाठी विवाह सोहळ्यातच स्त्रीजन्माच्या स्वागताविषयी सकारात्मक भावना निर्माण झाली तर भविष्यात सकारात्मक बदल घडू शकेल, अशी भावना डॉ. सुधा कांकरिया यांनी व्यक्त केली. या प्रसंगी डॉ. प्रकाश कांकरिया, किरण कांकरिया, रत्नप्रभा छाजेड उपस्थित होते.

------------

Web Title: ‘Let’s take the eighth turn, welcome the female birth’