गरज पडल्यास कोविड सेंटर सुरु करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:28 IST2021-02-26T04:28:49+5:302021-02-26T04:28:49+5:30

गरज पडल्यास सरकारी कोविड सेंटर सुरू करणे, कोरोना प्रादुर्भाव रोखण्याविषयी जनजागृती करणे, लग्न समारंभ, गर्दीचे सोहळे यावर करडी नजर ...

Let's start Kovid Center if needed | गरज पडल्यास कोविड सेंटर सुरु करू

गरज पडल्यास कोविड सेंटर सुरु करू

गरज पडल्यास सरकारी कोविड सेंटर सुरू करणे, कोरोना प्रादुर्भाव रोखण्याविषयी जनजागृती करणे, लग्न समारंभ, गर्दीचे सोहळे यावर करडी नजर ठेवणे, औषधसाठा या विषयी चर्चा झाली. गावागावात होऊ घातलेल्या विवाह सोहळ्यांवर ग्रामसेवक व तलाठी यांनी गर्दी नियंत्रणासाठी नजर ठेवणे. वेळप्रसंगी दंडात्मक कारवाई करणे अशा सूचना गटविकास अधिकारी यांनी ग्रामसेवकांना दिल्या.

निवासी नायब तहसीलदार ठाकाजी महाले, गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी, नगरपंचायतचे मुख्याधिकारी विक्रम जगदाळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.इंद्रजित गंभिरे आदी उपस्थित होते.

...............

अतिक्रमणधारकांचा घेतला आढावा

नगरपंचायत हद्दीतील अतिक्रमणधारकांना भोगावटादार असल्याचे ईमला उतारा देण्याची प्रक्रिया सुरू असून याबाबतचा आढावा आमदार डॉ.लहामटे यांनी गुरुवारी राष्ट्रवादी कार्यालयात घेतला. शासन मालक आणि अतिक्रमणधारक रहिवासी भोगवटादार हे सरकारी धोरण आहे. भविष्यात या शाहूनगर-इंदिरानगर परिसराचा विकास करण्यासाठी वा म्हाडाच्या धर्तीवर घरकुल इमारती तयार करण्यासाठी काही योजना आखता येईल का? शाहुनगर टेकडीवर विकास योजना राबविता येईल का? याविषयी साधक चर्चा केली. ज्येष्ठ नेते मधुकर नवले, दादापाटील वाकचौरे, भानुदास तिकांडे, मीनानाथ पांडे, संपत नाईकवाडी, सुरेश खांडगे, संदीप शेणकर, मुख्याधिकारी विक्रम जगदाळे आदी उपस्थित होते.

Web Title: Let's start Kovid Center if needed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.