तालुक्यातील पाटपाण्याच्या प्रश्नांची सोडवणूक करू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:26 IST2021-09-04T04:26:24+5:302021-09-04T04:26:24+5:30
उजव्या उच्चस्तरीय कालव्यात पाणी सोडून शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळण्यासाठी प्रवरा नदीवरील जलसेतूचे काम तातडीने पूर्ण करा, या प्रमुख मागणीसाठी ...

तालुक्यातील पाटपाण्याच्या प्रश्नांची सोडवणूक करू
उजव्या उच्चस्तरीय कालव्यात पाणी सोडून शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळण्यासाठी प्रवरा नदीवरील जलसेतूचे काम तातडीने पूर्ण करा, या प्रमुख मागणीसाठी शुक्रवारी धामणगाव आवारी, आंबड, धुमाळवाडी, वाशेरे, मनोहरपूर, कळससह आठ गावांतील शेतकऱ्यांनी आंदोलन छेडले. महात्मा फुले चौकातून निघालेल्या आक्रोश मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. मोर्चाला आमदार डाॅ. लहामटे यांनी आंदोलकांच्या भावना समजून घेतल्या. यावेळी लहामटे बोलत होते.
टाळ मृदंग, पारंपरिक वाद्यांचा गजर व शेतकरी एकजुटीच्या घोषणांनी शहर दणाणले होते. दोनशे ट्रॅक्टर घेऊन रॅली काढण्यात आली होती. सभेच्या अध्यक्षस्थानी खंडूबाबा वाकचौरे होते. तालुक्याच्या हक्काचे पूर्ण पाणी मिळेपर्यंत शेतकऱ्यांच्या आक्रोश थांबणार नाही. वेळ पडल्यास आंदोलन अधिक तीव्र करू असा इशारा शेतकरी नेते डाॅ. अजित नवले यांनी यावेळी दिला. बाळासाहेब भोर यांनी प्रास्ताविक केले. शांताराम गजे, महेश नवले, मच्छिंद्र धुमाळ, सीताराम भांगरे, सुरेश भोर, आप्पा आवारी, बाळासाहेब आवारी, माधव भोर, ज्ञानेश्वर देशमुख, भाग्यश्री आवारी, नीता आवारी, अनिता किरण गजे, रेश्मा कानवडे, स्वाती शेणकर, सचिन वाळुंज, मच्छिंद्र पानसरे या शेतकऱ्यांची भाषणे झाली.
काॅम्रेड कारभारी उगले, गिरजाजी जाधव, विनय सावंत, डाॅ. रवींद्र गोर्डे, सुरेश खांडगे, परभत नाईकवाडी, सुरेश नवले, संदीप शेणकर, भागवत शेटे, कार्यकारी अभियंता संगीता जगताप, प्रमोद माने, एम.बी. शिरसागर, प्रभारी पोलीस निरीक्षक मिथुन घुगे आदि उपस्थित होते. मोर्चात महिला शेतकऱ्यांची उपस्थिती लक्षणीय होती. मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
( फोटो आहे)