नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापना सील करू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:18 IST2021-04-03T04:18:28+5:302021-04-03T04:18:28+5:30
जिल्हाधिकारी भोसले यांनी शिर्डीच्या कोविड रुग्णालयाला भेट दिली. आढावा बैठकीपूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील ...

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापना सील करू
जिल्हाधिकारी भोसले यांनी शिर्डीच्या कोविड रुग्णालयाला भेट दिली. आढावा बैठकीपूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखराणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार कुंदन हिरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ़ प्रमोद म्हस्के, डॉ. संजय गायकवाड, डॉ. गोकुळ घोगरे, मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे, संस्थानचे डॉ. प्रीतम वडगावे, डॉ. मैथिली पितांबरे, पोलीस उपअधीक्षक संजय सातव, पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे, निहालदे आदींची उपस्थिती होती.
भोसले म्हणाले, गेल्या वर्षीच्या लाटेपेक्षा मृत्यूचे प्रमाण कमी असले तरी यावेळी संसर्गाचा वेग जास्त आहे. जिल्ह्यात सध्या ८ हजार ३०० अॅक्टिव्ह पेशंट असून, आज दिवसभरात १ हजार ८०० व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. गेल्या वर्षीच्या सप्टेंबरमध्ये सर्वाधिक पेशंट होते. या महिन्यात रुग्णांचा आकडा बारा ते पंधरा हजारांवर जाण्याची चिन्हे आहेत. त्यादृष्टीने प्रशासनाने नियोजन केले आहे. ग्रामीण भागात २२ सेंटरवर वीस हजार बेडचे नियोजन करण्यात आले आहे. टेस्टचे रिपोर्ट मिळेपर्यंत नागरिक बाहेर फिरत असल्याच्या तक्रारी आहेत. नागरिकांनी स्वयंशिस्त पाळून विलगीकरणात राहावे.
यापुढे टेस्टचा रिपोर्ट दोन दिवसांत मिळू शकेल. पूर्वीच्या मशीनची क्षमता तीनशे रिपोर्ट प्रति दिवस होती, आता आणखी एक मशीन वाढवण्यात आले आहे. पंतप्रधान योजनेतून व्हेंटिलेटर वाढवण्यात येतील. कमी दरात रेमडेसिवीर उपलब्ध करण्यासाठीही प्रयत्न करू. जिल्ह्यात लसींची कमतरता नसून पुरेसा स्टॉक उपलब्ध आहे.