आमदारकीचे स्वप्न पाहणाऱ्यांना आस्मान दाखवू

By Admin | Updated: June 23, 2014 00:05 IST2014-06-22T23:19:58+5:302014-06-23T00:05:51+5:30

बबनराव पाचपुते: राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत इशारा

Let the fans see the dream of the MLA | आमदारकीचे स्वप्न पाहणाऱ्यांना आस्मान दाखवू

आमदारकीचे स्वप्न पाहणाऱ्यांना आस्मान दाखवू

श्रीगोंदा : सर्वसामान्य मतदार बरोबर असल्याने विरोधकांना घाबरत नाही. आगामी विधानसभा निवडणुकीत १९८० चा पॅटर्न राबवून आमदारकीची स्वप्न पाहणाऱ्यांना अस्मान दाखविण्याचा इशारा आ. बबनराव पाचपुते यांनी दिला.
काष्टी येथे आयोजित राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या बैठकीत पाचपुते बोलत होते. ते म्हणाले, राजकीय जीवनात पक्षांतर करताना अगोदर कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच पुढची पावले टाकली आहेत. मागच्या दरवाजाने कधीच पक्षांतर केले नाही. गेल्या वर्षी दुष्काळ पडला. मंत्रीपदाची प्रतिष्ठा पणाला लावत जनावरांसाठी छावण्या सुरू केल्या. उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी दोन आवर्तने सोडली. कालवा सल्लागार समितीच्या बैठकांना काहींना मी बसू दिले, परंतु माझ्या विरोधात चुकीचा प्रचार केला. मी मनात आणले असते तर बैठकीतून एका मिनिटात बाहेर काढले असते. पाणी प्रश्नावर मी शुद्धीत बोलतो, घरात बसून बोलत नाही, असा टोला पाचपुते यांनी घन:श्याम शेलार, कुंडलिकराव जगताप यांना मारला.
यावेळी बाबासाहेब भोस, भगवान पाचपुते, अ‍ॅड. विठ्ठल काकडे, अरुण हिरडे, सुदाम नवले, मुकुंद सोनटक्के, दिनकर पंधरकर, संग्राम पवार, सुनीता वाघमारे, दादा मोळक, जिजाबापू शिंदे, बबन मदने, बलभिम कासार, हरिदास शिर्के, रामदास घोडके यांची भाषणे झाली. (तालुका प्रतिनिधी)
शेलारांच्या राजीनाम्यावर नो कॉमेन्ट..
घनश्याम शेलार यांनी राष्ट्रवादी काँगे्रसच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. यावर पत्रकारांनी आ. बबनराव पाचपुतेंना छेडले असता त्यांनी ‘नो कॉमेन्ट’ एवढीच प्रतिक्रिया दिली.
विक्रमसिंह पाचपुतेंनी सुनावले खडे बोल
काही कार्यकर्त्यांना फोन केले तरी बैठकांना येत नाहीत. नेहमीच बैठकांना दांडी मारणाऱ्या कार्यकर्त्यांवर कारवाई झाली पाहिजे. पूर्वी संघटनेत परखड बोलणारे कार्यकर्ते होते, परंतु आता ते कमी झाले आहेत. साईकृपाने सर्वाधिक भाव दिला. एक किलोचा काटा कधी मारला नाही. कार्यकर्त्यांनी पक्ष आणि नेत्यांविषयी सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा, असे खडे बोल विक्रम पाचपुते यांनी सुनावले़
चुकलो तर...
 साईकृपाचे दोन्ही कारखाने पूर्ण क्षमतेने चालू करणार आहे. कार्यकर्त्यांना दुसऱ्याच्या दारात जाऊ देणार नाही. साईकृपा १२५ रुपयाचे बिल दिवाळीपूर्वी देणार आहे. आमची बांधिलकी कार्यकर्त्यांशी, आमचे चुकले तर चार भिंतीच्या आत आमचा कान धरा, पण रस्त्यावर कशासाठी चर्चा करता, अशी खंत साईकृपाचे अध्यक्ष सदाअण्णा पाचपुते यांनी व्यक्त केली.

Web Title: Let the fans see the dream of the MLA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.