मढी परिसरात वन विभागाने लावलेल्या पिंज-यात बिबट्या अखेर जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 11:53 IST2020-12-03T11:47:45+5:302020-12-03T11:53:47+5:30

तिसगाव : वन विभागाने मढी परिसरात लावलेल्या पिंज-यात बिबट्या अखेर जेरबंद झाला. बिबट्या नर जातीचा असल्याची माहिती वन विभागाने दिली.

Leopards finally trapped in a cage set up by the forest department in Madhi area | मढी परिसरात वन विभागाने लावलेल्या पिंज-यात बिबट्या अखेर जेरबंद

मढी परिसरात वन विभागाने लावलेल्या पिंज-यात बिबट्या अखेर जेरबंद

तिसगाव (.ता. पाथर्डी) : श्री क्षेत्र मढी ( ता. पाथर्डी) येथे गुरुवारी पहाटे भक्ष्यासह लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला. 

शेजारील पिंजऱ्याऐवजी मुख्य पिंजऱ्यातच बोकड भक्ष्य ठेवण्याची वन विभागाची युक्ती कमालीची परिणामकारक ठरली. बुधवारी सायंकाळी पानतासवाडी - घाटशिरस रस्त्यावर चैतन्य नगर भागातील रहिवासी खलील दाऊबा शेख यांचे पाळीव कुत्र्याची बिबट्याने शिकार केली. त्या शिकारीचा झाडा-झुडपातील माग काढत तिसगाव वन परिक्षेत्र अधिकारी कर्मचारी यांनी ठसे घेतले. त्यानुसार बिबट्यावर हेरून पिंजरा लावला. नैसर्गिक छपराप्रमाणे पिंजरा भक्ष ठेवून पाल्या-पाचोळ्यानी पिंजरा झाकला. गुरुवारी दैनंदिन पाहणी करताना बिबट्या जेरबंद झाल्याचे आढळून आले. सकाळी आठ वाजता शेरी मळ्यातील अर्जुन मरकड यांचे शेत तलाव जवळील पिंजऱ्यात बिबट्या अडकल्याची माहिती सार्वत्रिक झाली. त्यानंतर ग्रामस्थांची तोबा गर्दी लोटली. गर्दीमुळे बिबट्या आणखीनच बिथरला व डरकाळ्या टाकीत पिंजऱ्याला धडका मारू लागला. सुरक्षेमुळे वन कर्मचाऱ्यानी तात्काळ त्याला अहमदनगर येथे हलविले. दरम्यान पकडलेला बिबट्या नर जातीचा असल्याचा प्राथमिक लक्षणांवरून अंदाज आहे. तज्ञांचे  तपासणीनंतर त्यावर शिककामोर्तब होईल, असे वन परिक्षेत्र अधिकारी दादासाहेब वाघुलकर यांनी लोकमतला सांगितले. आमदरा पानतासवाडी चैतन्य नगर परिसरात च बिबट्याने दोन बालके व काही पाळीव प्राण्यांची शिकार केली असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे बहुचर्चित नरभक्षक बिबट्या हाच असल्याचा कयास बांधला जात आहे.

Web Title: Leopards finally trapped in a cage set up by the forest department in Madhi area