विसापुरात बिबट्याची दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:23 IST2021-09-11T04:23:08+5:302021-09-11T04:23:08+5:30
विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथे बिबट्याने गेल्या आठवडाभरात चांगलीच दहशत निर्माण केली आहे. चार दिवसांत बिबट्याने वेगवेगळ्या ठिकाणी ...

विसापुरात बिबट्याची दहशत
विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथे बिबट्याने गेल्या आठवडाभरात चांगलीच दहशत निर्माण केली आहे. चार दिवसांत बिबट्याने वेगवेगळ्या ठिकाणी दोन शेळ्यांचा फडशा पाडला आहे.
विसापूर जलाशयाचे पाणी व लपण्यासाठी उसाचे क्षेत्र यामुळे गेल्या दोन वर्षांपासून विसापूर परिसरात मोठ्या प्रमाणात बिबट्याचा वावर वाढला आहे. यापूर्वी शिंदे मळा शिवारात बिबट्या आढळून येते होता. त्या ठिकाणी रानडुक्करांची व कुत्र्यांची संख्या कमी झाली. बिबट्यापासून संरक्षणासाठी बहुतेक शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांचे गोठ्याला जाळी ठोकून घेतली. त्यामुळे त्या ठिकाणी वन्यप्राण्यांपासून शेतकऱ्यांचे नुकसान कमी झाले. परंतु, बिबट्याचा वावर कमी झाला नाही. आता मात्र बिबट्याने विसापूर येथे रेल्वेलाईनचे पूर्वेकडील जठार वस्तीवर चार दिवसांपूर्वी अनिल जठार यांच्या शेळीचा फडशा पाडला.
गुरूवारी रात्री आडेआठच्या सुमारास चांभूर्डी रस्त्यावर सरपंच अरविंद जठार यांच्या शेतात मजुरी करणारे सुनील मनीलाल मोरे यांच्या शेळीवर बिबट्याने हल्ला चढविला. याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी रवींद्र भोगे यांना माहिती दिली. भोगे यांच्या सूचनेनुसार वन कर्मचारी लक्ष्मण लगड यांनी या ठिकाणी पंचनामा केला. तर पशुधन अधिकारी डॉ. नितीन पवार, डॉ. तुकाराम जाधव व पोपट जठार यांनी शवविच्छेदन केले.