रस्ता ओलांडताना कारच्या बोनेट मध्ये अडकला बिबट्या; सुटका होताच ठोकली धूम
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 19:43 IST2022-06-20T19:42:55+5:302022-06-20T19:43:48+5:30
नाशिक - पुणे महामार्गावर चंदनापुरी घाटाच्या पायथ्याशी बिबट्या रस्ता ओलांडत होता.

रस्ता ओलांडताना कारच्या बोनेट मध्ये अडकला बिबट्या; सुटका होताच ठोकली धूम
लोकमत न्यूज नेटवर्क
संगमनेर : नाशिक - पुणे महामार्गावर चंदनापुरी घाटाच्या पायथ्याशी बिबट्या रस्ता ओलांडत होता. या दरम्यान एका चारचाकीने धडक दिली. यात बिबट्या कारच्या बोनेटमध्ये अडकला. मात्र, वाहन चालकाने कार मागे - पुढे केल्याने बिबट्याची सुटका होताच त्याने परिसरातील जंगलात धूम ठोकली. या अपघातात बिबट्या जखमी झाला. ही घटना सोमवारी सकाळी दि. २० जून सकाळी पावणे सात वाजेच्या सुमारास घडली.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेल्या माहितीनुसार, अज्ञात कार पुण्याहून नाशिकच्या दिशेने जात असताना कार संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी घाटात आली असता त्याच दरम्यान बिबट्या रस्ता ओलांडत असताना बिबट्याला कारची जोराची धडक बसली. यात बिबट्या कारच्या बोनेट मध्ये अडकला. बोनेटमधून निसटण्याचा खूप वेळ प्रयत्न केला. कार चालकाने कार पुढे मागे घेतल्याने बिबट्याची सुटका झाली. सुटका होताच बिबट्याने परिसरातील जंगलात धूम ठोकली. मात्र, बिबट्या जखमी झाला होता. कार चालकही कार घेऊन पसार झाला.