अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:27 IST2021-09-16T04:27:06+5:302021-09-16T04:27:06+5:30

नाशिक-पुणे महामार्गावरील आळेखिंड, माहुली, चंदनापुरी, कर्हे घाट आदी परिसरात बिबट्यांचा वावर नेहमीच आढळून येतो. सदरचा परिसर बिबट्यांचा नैसर्गिक अधिवास ...

Leopard killed in unidentified vehicle collision | अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

नाशिक-पुणे महामार्गावरील आळेखिंड, माहुली, चंदनापुरी, कर्हे घाट आदी परिसरात बिबट्यांचा वावर नेहमीच आढळून येतो. सदरचा परिसर बिबट्यांचा नैसर्गिक अधिवास मानला जातो. त्यामुळे अनेकदा बिबटे रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात असताना वाहनांच्या धडकेत गतप्राण होण्याच्या घटना घडताहेत.

बुधवारी पहाटेच्या साडेतीन वाजण्याच्या सुमारास सुमारे पाच वर्षांचा नर बिबट्या रस्ता ओलांडत होता. त्याचवेळी नाशिककडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. या धडकेत बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. यानंतर मृत बिबट्याला पाहण्यासाठी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी गर्दी केली. येथील स्थानिकांना ही बाब समजल्यानंतर त्यांनी वनविभागाचे वनपाल रामदास थेटे यांना अपघाताबद्दल माहिती दिली. वनपाल रामदास थेटे, वनरक्षक सुभाष धानापुरे, सुजाता ठेंबरे, वनमजूर दिलीप बहिरट, वनकर्मचारी यादव यांनी घटनास्थळी धाव घेत बिबट्याच्या मृतदेहाचा पंचनामा करून मृत बिबट्या ताब्यात घेतला. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर चंदनापुरी रोपवाटिकेत मृतदेहाचे दहन करण्यात आले आहे.

दरम्यान,

वाहनांच्या वेगमर्यादेचे वारंवार उल्लंघन होत असल्याने अनेक वन्यप्राण्यांना आपला जीव गमवावा लागतो आहे.

Web Title: Leopard killed in unidentified vehicle collision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.