संगमनेर तालुक्यात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2020 14:11 IST2020-12-20T14:07:54+5:302020-12-20T14:11:06+5:30
संगमनेर : रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात असलेल्या बिबट्याला अज्ञात वाहनाने धडक दिली. या धडकेत बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना संगमनेर तालुक्यातील निमज गावच्या शिवारात रविवारी ( दि. २०) पहाटे घडली असण्याची शक्यता वनविभागाने वर्तविली.

संगमनेर तालुक्यात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू
संगमनेर : रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात असलेल्या बिबट्याला अज्ञात वाहनाने धडक दिली. या धडकेत बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना संगमनेर तालुक्यातील निमज गावच्या शिवारात रविवारी ( दि. २०) पहाटे घडली असण्याची शक्यता वनविभागाने वर्तविली.
अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाल्याची माहिती संगमनेर वनविभागाचे वनरक्षक सी.डी. कासार यांना रविवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास समजली. वनपाल एस.आर.पाटोळे, वनकर्मचारी अरुण यादव, अण्णा हजारे यांच्यासह वनरक्षक कासार हे तात्काळ घटनास्थळी पोहोचले. निमज गावच्या शिवारातील खंडोबा मंदिराकडे जाणार्या रस्त्यावर अज्ञात वाहनाने बिबट्याला धडक दिली. यात बिबट्याच्या तोंडाला गंभीर मार लागला. हा बिबट्या नर जातीचा असून तो दीड वर्ष वयाच्या असल्याचे कासार यांनी सांगितले. पंचनामा केला असून बिबट्याचा मृतदेह वनविभागाने उत्तरीय तपासणीसाठी ताब्यात घेत अंत्यसंस्कार केले.