बिबट्या जेरबंद
By Admin | Updated: August 12, 2014 23:16 IST2014-08-12T22:52:57+5:302014-08-12T23:16:02+5:30
आश्वी : भक्ष्याच्या शोधार्थ भटकंती करीत फिरणारे बिबट्याचे बछडे विहिरीत पडल्यानंतर त्यास वन विभागाने जेरबंद केले.

बिबट्या जेरबंद
आश्वी : भक्ष्याच्या शोधार्थ भटकंती करीत फिरणारे बिबट्याचे बछडे विहिरीत पडल्यानंतर त्यास वन विभागाने जेरबंद केले. या परिसरात बिबट्याची मादी बछड्यांसह फिरत होती. रात्री एक ९ महिन्याचा बछडा सरपंच जयश्री ताजणे यांच्या विहिरीत पडला. वनरक्षक नामदेव ताजणे, व्ही.आर.काळे, वनपाल डांगे, अंबादास मेहेत्रे यांनी विहिरीत पिंजरा सोडला. परंतू बिबट्या पाहण्यासाठी झालेल्या गर्दीच्या गोंगाटाने शेजारील ऊसातून बिबट्याच्या मादीचा गुरगुरण्याचा आवाज आला. त्यामुळे विहिरीतील बछड्याला जेरबंद करणे अवघड झाले. अखेरीस जमावास शांत करीत वन कर्मचाऱ्यांनी बछड्यास जेरबंद केले. या भागात पिंजरा लावण्याची मागणी उपसरपंच भारत जऱ्हाड, सुनील खेमनर, हरीभाऊ ताजणे यांनी केली आहे. (वार्ताहर)