बेलवंडीत बिबट्या आला रे ...उसाच्या मळ्यात मांडले बस्तान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 11:17 IST2020-05-24T11:16:58+5:302020-05-24T11:17:28+5:30

बेलवंडी स्टेशन परिसरातील उसाच्या मळ्यात बिबट्याने बस्तान मांडले आहे. बिबट्याने शनिवारी संध्याकाळी माजी सरपंच दिलीप रासकर यांना दर्शन दिले आहे. त्यांनी बिबट्याला कॅमेºयात कैद केले आहे. 

A leopard came to Belwandi | बेलवंडीत बिबट्या आला रे ...उसाच्या मळ्यात मांडले बस्तान

बेलवंडीत बिबट्या आला रे ...उसाच्या मळ्यात मांडले बस्तान

बेलवंडी : बेलवंडी स्टेशन परिसरातील उसाच्या मळ्यात बिबट्याने बस्तान मांडले आहे. बिबट्याने शनिवारी संध्याकाळी माजी सरपंच दिलीप रासकर यांना दर्शन दिले आहे. त्यांनी बिबट्याला कॅमेºयात कैद केले आहे. 
 दिलीप रासकर हे शनिवारी उसाचे बेणे पाहण्यासाठी गेले असता बेलवंडी स्टेशन रेल्वे पुलाच्या परिसरातील राजू पोपट काळाणे यांच्या उसाच्या शेतात  त्यांना बिबट्या दिसला. रासकर यांनी वनविभागाचे संदीप भोसले यांना कल्पना दिली. लॉकडाऊनच्या काळात सर्व लोक घरीच असतात. तसेच रात्रीची लाईट वेळ असल्यावर शेतात पाणी देण्यास जात असतात. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या परिसरात पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी आता नागरिकांमधून होत आहे.
 

Web Title: A leopard came to Belwandi