कंपनीत रजा टाकून ‘त्या’ रमल्या कोरोना बाधितांच्या सेवेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:16 IST2021-05-03T04:16:25+5:302021-05-03T04:16:25+5:30

श्रीगोंदा : शिरूर तालुक्यातील जांभूत येथील राणी अभय फिरोदिया या महिलेने कंपनीत एक महिन्याची रजा टाकून कोरोना बाधितांची सेवा ...

Leaving the company and playing 'those' corona in the service of the victims | कंपनीत रजा टाकून ‘त्या’ रमल्या कोरोना बाधितांच्या सेवेत

कंपनीत रजा टाकून ‘त्या’ रमल्या कोरोना बाधितांच्या सेवेत

श्रीगोंदा : शिरूर तालुक्यातील जांभूत येथील राणी अभय फिरोदिया या महिलेने कंपनीत एक महिन्याची रजा टाकून कोरोना बाधितांची सेवा सुरू केली आहे. लोणी व्यंकनाथ येथील व्यंकनाथ कोविड सेंटरमध्ये त्या स्वयंसेविका म्हणून काम करीत आहेत.

राणी फिरोदिया या कारेगाव एमआयडीसीतील एका खासगी कंपनीत नोकरी करतात. त्यांची श्रीगोंदा येथील बहीण राखी संदीप पिपाडा ही कोरोनाबाधित होती. राखी पिपाडा यांना लोणी व्यंकनाथ येथील व्यंकनाथ कोविड सेंटरमध्ये क्वारंटाईन करण्यात आले.

बहिणीच्या सेवेसाठी राणी फिरोदिया येथे आल्या होत्या. राखीने पाच दिवसात कोरोनावर मात केली. त्यानंतर मात्र फिरोदिया यांनी कंपनीत रजा टाकून कोरोना बाधित रुग्णांची सेवा करण्याचा निर्णय घेतला.

राणी फिरोदिया या सकाळी पाच वाजता रुग्णांना उठवतात. व्यायाम करण्यास सांगतात. त्यानंतर चहापाणी देतात. त्यानंतर नाष्टा, औषधे देऊन रुग्णांशी संवाद साधतात.

फिरोदिया यांची घरची परिस्थिती जेमतेम आहे. मात्र, समाजसेवेची आवड असल्याने काम करीत आहेत.

---

बहिणीसाठी व्यंकनाथ कोविड सेंटरमध्ये आले होते. येथे रुग्णांना विनामूल्य सेवा दिली जाते. मुले-मुली स्वयंसेवक म्हणून काम करतात हे पाहिले. त्यानंतर मीही स्वयंसेवक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. रूग्ण सेवेतून समाधान मिळत आहे.

- राणी फिरोदिया,

जांबूत, ता. शिरूर

---

अहवाल कोरोना बाधित आला की, जवळचे लोक परके होतात. साधा कोणी फोनही करत नाही. मात्र, लोणी व्यंकनाथमधील कोविड सेंटरमधील राणी फिरोदिया कोरोना बाधितांची निस्वार्थपणे अहोरात्र सेवा करीत आहेत.

- मनीषा ढवळे,

खांडगाव, ता. श्रीगोेंदा

----

०२ राणी फिरोदिया

Web Title: Leaving the company and playing 'those' corona in the service of the victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.