नांदूर मधमेश्वर कालव्याला आवर्तन सोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:21 IST2021-07-30T04:21:28+5:302021-07-30T04:21:28+5:30

कोपरगाव : नाशिक जिल्ह्यातील नांदूर मधमेश्वर जलद प्रकल्पांतर्गत भावली धरण ओव्हरफ्लो झाले आहे. या कालव्याच्या लाभक्षेत्रातील भागात पावसाने दडी ...

Leave the rotation to Nandur Madhameshwar canal | नांदूर मधमेश्वर कालव्याला आवर्तन सोडा

नांदूर मधमेश्वर कालव्याला आवर्तन सोडा

कोपरगाव : नाशिक जिल्ह्यातील नांदूर मधमेश्वर जलद प्रकल्पांतर्गत भावली धरण ओव्हरफ्लो झाले आहे. या कालव्याच्या लाभक्षेत्रातील भागात पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे तातडीने पाण्याचे आवर्तन सोडून त्याद्वारे गावतळे, बंधारे भरून द्यावे, अशी मागणी भाजपाच्या प्रदेश सचिव माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी वैजापूर येथील कार्यकारी अभियंता कार्यालयाकडे केली आहे.

कोल्हे म्हणाल्या, गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे नागरिकांच्या तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकल्पांतर्गत भावली धरण पूर्णपणे भरलेले आहे. एक व दोन वितरीका वरील पाणीवापर संस्थांचे पदाधिकारी, विविध गावचे सरपंच, शेतकरी आदींनी पाण्याचे आवर्तन सोडवे म्हणून मागणी केली आहे. या भागातील विहिरी, बंधारे, गावतळे कोरडी पडली आहेत. त्यात पाणी सोडल्यास त्याचा फायदा आसपासच्या परिसरास होणार आहे. पिण्याच्या पाण्याचे संकट कमी होईल. तरी जलसंपदा खात्याने तातडीने पावले उचलून नांदूर मधमेश्वर जलद कालव्यातून आवर्तन सोडून शेतकरी वगार्गसह सर्वांना दिलासा द्यावा.

Web Title: Leave the rotation to Nandur Madhameshwar canal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.