रक्ताच्या दोन नातेवाइकांच्या उपस्थितीत अखेरचा निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:19 IST2021-05-01T04:19:53+5:302021-05-01T04:19:53+5:30
अहमदनगर : अंत्यविधीसाठी हजारोंच्या संख्येेने नातेवाईक जमत असत. मात्र, कोरोना मृत्यू झाल्यास रक्ताच्या दोन नातेवाइकांच्या उपस्थितीतच अंत्यविधी पार पडत ...

रक्ताच्या दोन नातेवाइकांच्या उपस्थितीत अखेरचा निरोप
अहमदनगर : अंत्यविधीसाठी हजारोंच्या संख्येेने नातेवाईक जमत असत. मात्र, कोरोना मृत्यू झाल्यास रक्ताच्या दोन नातेवाइकांच्या उपस्थितीतच अंत्यविधी पार पडत असून, अंत्यविधीसाठी दोन नातेवाईक उपस्थित असतात.
कोरोनाने जिल्हाभर कहर माजविला आहे. मृत्यूच्या संख्येतही वाढ झालेली आहे. अंत्यविधीसाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी प्रशासानाकडून रक्ताच्या दोन नातेवाइकांनाच फक्त उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. अहमदनगर महापालिकेच्या वतीने तसा आदेश जारी करण्यात आलेला आहे. गेल्या वर्षभरापासून शहरासह ग्रामीण भागात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचे प्रमाण वाढले आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांवर नगरमधील अमरधाम व सावेडी स्मशानभूमीत अंत्यविधी केला जात आहे. अंत्यविधीसाठी रक्तातील दोन नातेइकांनाच परवानगी असल्याने जवळच्या दोन नातेवाइकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार होत आहेत. नातेवाईक फोन करण्याआधीच अंत्यविधीसाठी उपस्थित असतात. अंत्यविधीसाठीही नातेवाईक आले नाही, अशी परिस्थिती नाही. अंत्यविधीसाठी पुष्पहार घेऊन नातेवाईक उपस्थितच असतात. चेहरा ओळखून त्यांच्याच उपस्थित अंत्यविधी पार पडत असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले.
महापालिकेने अंत्यविधीची मोफत सुविधा उपलब्ध करून दिली आहे. अंत्यविधीसाठी लागणारा सर्वच खर्च महापालिकेच्या तिजोरीतून केला जात आहे. शहरासह ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांवर अंत्यविधी नगरमध्ये करण्यात येत असून, यासाठी महापालिकेने स्वयंसेवकांची नेमणूक केली आहे. हे स्वयंसेवक सावेडी व अमरधाम येथे अंत्यविधी करण्याचे काम करत आहेत.
...
१५ स्वयंसेवक करतायेत दररोज ४० ते ५० जणांवर अंत्यसंस्कार
महापालिकेने नियुक्त केलेल्या संस्थेने कोरोनामुळे मृत पावलेल्यांवर अंत्यविधीसाठी करण्यासाठी १५ स्वयंसेवकांची नेमणूक केली असून, हे स्वयंसेवक गेल्या वर्षभरापासून कोरोना रुग्णांचे अंत्यसंस्कार करण्याचे काम करत आहेत.
.....
वर्षभरात मृत्यू झालेल्यांची संख्या
२,९८३
......
विनामूल्य दफनविधी
- मुस्लीम समाजातील कोरोना रुग्ण दफन करण्यासाठी राष्ट्रवादीचे साहेबान जाहागिरदार यांनी पुढाकार घेतला. गेल्या वर्षभरापासून विनामूल्य दफनविधी करण्याचे काम करत आहेत. महापालिकेकडून एका रुपयाचीही मदत न घेता हे काम सेवाभावी वृत्तीने करत आहे. त्यांच्याशी संपर्क साधला असता साहेबान जाहागिरदर म्हणाले, गेल्या वर्षभरापासून दफनविधी करण्याचे काम करतो आहे. स्वखर्चाने हे काम करत असल्याचे ते म्हणाले.
.....
- महापालिकेच्या वतीने कोरोना रुग्णांवर मोफत अंत्यविधी केले जात आहेत. गेल्या वर्षभरापासून शहरी व ग्रामीण भागातील रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्याचे काम अहोरात्र सुरू आहे. स्वयंसवेक स्वत:चा जीव धोक्यात घालून हे काम करत आहेत.
- सादिक सरदार पठाण, महापालिका कर्मचारी