शेवटचा दिवसही थेट भेटीचाच, शक्ती प्रदर्शन अनेकांनी टाळले
By Admin | Updated: October 13, 2014 23:07 IST2014-10-13T23:04:05+5:302014-10-13T23:07:10+5:30
अहमदनगर : विधानसभा निवडणुकीसाठी गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेली प्रचाराची रणधुमाळी सोमवारी सायंकाळी सहा वाजता थंडावली़

शेवटचा दिवसही थेट भेटीचाच, शक्ती प्रदर्शन अनेकांनी टाळले
अहमदनगर : विधानसभा निवडणुकीसाठी गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेली प्रचाराची रणधुमाळी सोमवारी सायंकाळी सहा वाजता थंडावली़
गेल्या काही दिवसांपासून प्रचाराच्या माध्यमातून राजकीय रणांगण पेटविणाऱ्या प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी शेवटच्या दिवशी मात्र, शक्ती प्रदर्शन करणे टाळले़ शिवसेना, भाजपाने स्टार प्रचारकांची सभा घेवून सांगता केली़ नेहमीप्रमाणे मात्र, या सभांमध्ये शक्ती प्रदर्शनाचा ज्वर दिसला नाही़
काँग्रेस व राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी शेवटच्या दिवशी भेटीगाठीवरच भर दिला़ त्यांनी सभा अथवा रोड शो केला नाही़ शहरातील माणिक चौक येथे भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शहानवाज हुसेन यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते़ या सभेची वेळ दुपारी तीनची होती़ हुसेन प्रत्यक्षात पोहोचले सायंकाळी साडेचार वाजता़ त्यांनी बारा मिनिटात भाषण आटोपते घेतले़ शिवसेनेने अभिनेते डॉ़ अमोल कोल्हे यांच्या रोड शोचे आयोजन केले होते़ भिस्तबाग चौकात चौक सभा घेवून त्यांनी प्रचाराची सांगता केली़ उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून शहरात विविध पक्षांनी नेत्यांच्या जाहीर सभा, चौक सभा, रोड शो, बैठकांचा धडाका सुरू केला होता़ प्रचाराच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व भाजपाचे उमेदवार मोठे शक्ती प्रदर्शन करतील असा सर्वांचा अंदाज होता़ सर्वच उमेदवारांनी शेवटच्या दिवशीही ‘थेट भेट’ वरच लक्ष केंद्रित करत मतदारांशी संवाद साधला़ जाहीर प्रचार जरी थंडावला असला तरी आता पुढील नियोजनाला वेग आला असून, उमेदवारांसाठी येणारे काही तास जागता पहारा करावा लागणार आहे़ (प्रतिनिधी)