अखेरच्या दिवशी अर्ज भरण्यासाठी श्रीगोंद्यात झुंबड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:21 IST2020-12-31T04:21:56+5:302020-12-31T04:21:56+5:30
श्रीगोंदा : ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटच्या दिवशी एकच झुंबड उडाली. शहरातील रस्ते, चौक गर्दीने फुलून गेले होते. ...

अखेरच्या दिवशी अर्ज भरण्यासाठी श्रीगोंद्यात झुंबड
श्रीगोंदा : ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटच्या दिवशी एकच झुंबड उडाली. शहरातील रस्ते, चौक गर्दीने फुलून गेले होते. शेवटच्या दिवशी ६५० उमेदवारी अर्ज दाखल झाले. उमेदवारी अर्ज स्वीकारताना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची दमछाक झाली. ५९ ग्रामपंचायतींच्या ५६८ जागांसाठी एक हजार ९०० जणांनी उमेदवारी दाखल केली आहे. सध्या तरी एकाही गावची निवडणूक बिनविरोध झाली नाही. अर्ज मागे घेण्याच्या दिवशी चिखली, बाबुर्डी, ढवळगाव, बेलवंडी कोठार, निंबवी, बांगर्डे गावच्या ग्रामपंचायती बिनविरोध होतील, अशी शक्यता आहे. आमदार बबनराव पाचपुते यांनी श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील ज्या ग्रामपंचायती बिनविरोध होतील, अशा गावाला दहा लाखांचा निधी, तर येळपणे गटासाठी पंचायत समिती सदस्या कल्याणी लोखंडे यांनी २० लाखांचा निधी देण्याचे जाहीर केले आहे.