भूमिहीन रस्त्यावर

By Admin | Updated: May 31, 2014 00:23 IST2014-05-30T23:24:18+5:302014-05-31T00:23:56+5:30

कर्जत : वृध्द भूमिहीन शेतमजूर, महिला संघटना, ज्येष्ठ नागरिक संघाच्यावतीने विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात शुक्रवारी तहसील कार्यालयावर रणरणत्या उन्हात मोर्चा नेण्यात आला.

Landless road | भूमिहीन रस्त्यावर

भूमिहीन रस्त्यावर

कर्जत : वृध्द भूमिहीन शेतमजूर, महिला संघटना, ज्येष्ठ नागरिक संघाच्यावतीने विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात शुक्रवारी तहसील कार्यालयावर रणरणत्या उन्हात मोर्चा नेण्यात आला. शब्बीरभाई पठाण यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. संजय गांधी, इंदिरा गांधी, श्रावण बाळ योजनेतील ४७५ प्रकरणे मंजूर होऊनही लाभार्थी योजनेपासून वंचित आहेत. वर्षभरापासून संजय गांधी विभागाची बैठक झालेली नाही. त्यामुळे प्रकरणे धूळखात पडून आहेत. ही प्रकरणे मार्गी लावावी, ज्येष्ठ नागरिक, विधवा, परितक्त्यांची पिळवणूक करणारे मिरजगावचे मंडल अधिकारी दरेकर यांची बदली करावी, अन्न सुरक्षा योजनेचा लाभ लाभार्र्थींना मिळावा, बीपीएल कार्ड धारकांना पूर्वीप्रमाणे धान्य मिळावे, राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेची प्रकरणे मार्गी लावावी, ज्येष्ठ नागरिकांच्या मानधनात वाढ करावी, या प्रमुख मागण्यासंदर्भात मोर्चा नेण्यात आला. (तालुका प्रतिनिधी) प्रश्न मार्गी लागणार नायब तहसीलदार रजेवर असल्याने तहसीलदार जयसिंग भैसडे यांनी मागण्यांचे निवेदन स्वीकारले. प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही त्यांनी आंदोलनकर्त्यांना दिली. भर उन्हात मोर्चा निघाला. त्यामुळे मोर्चातील वृध्दांचे प्रचंड हाल झाले.

Web Title: Landless road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.