जागतिक विद्यापीठ निवड चाचणी स्पर्धेत लांडगेला रौप्यपदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:19 IST2021-03-24T04:19:37+5:302021-03-24T04:19:37+5:30

अखिल भारतीय विद्यापीठाचा ज्युदो संघ निवडीसाठी ११ ते १५ मार्च दरम्यान कानपूर (उत्तरप्रदेश) येथील राजर्षी शाहू महाराज विश्‍वविद्यालयात निवड ...

Landge won a silver medal in the World University Selection Test | जागतिक विद्यापीठ निवड चाचणी स्पर्धेत लांडगेला रौप्यपदक

जागतिक विद्यापीठ निवड चाचणी स्पर्धेत लांडगेला रौप्यपदक

अखिल भारतीय विद्यापीठाचा ज्युदो संघ निवडीसाठी ११ ते १५ मार्च दरम्यान कानपूर (उत्तरप्रदेश) येथील राजर्षी शाहू महाराज विश्‍वविद्यालयात निवड चाचणी घेण्यात आली. या निवड चाचणीमध्ये संपूर्ण भारतामधील प्रत्येक वजन गटातील उत्कृष्ट खेळाडूंना बोलवण्यात आले होते. त्यामध्ये नगरच्या दोन खेळाडूंची निवड करण्यात आली. सिद्धीबाग ज्युदो हॉलच्या आदित्य संजय धोपावकर व गणेश जितेंद्र लांडगे यांची निवड यात झाली होती. यामध्ये १०० किलो खालील वजन गटात गणेश लांडगे याने रौप्य पदक पटकावले.

ऑगस्ट २०२१ मध्ये चीन येथे जागतिक विद्यापीठ स्पर्धा होत आहेत. विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंचे जागतिक विद्यापीठ स्पर्धेपूर्वी प्रशिक्षण शिबिर घेण्यात येऊन त्यातून भारतीय संघाची निवड करण्यात येणार आहे. त्यामुळे संभाव्य जागतिक विद्यापीठ स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघात लांडगे यांची निवड झाली आहे.

गणेशला प्रा. संजय धोपावकर यांचे मार्गदर्शन लाभले. खा. डॉ. सुजय विखे, यंग मेन्स ज्युदो असो.चे अध्यक्ष अ‍ॅड. धंनजय जाधव, वैभव लांडगे, शुभम दातरंगे, आगाशे महाविद्यालयाचे प्राचार्य सोपान कांगणे आदींनी त्यास शुभेच्छा दिल्या.

--------

फोटो - २३गणेश लांडगे

Web Title: Landge won a silver medal in the World University Selection Test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.