पावणेसात लाखांचे एलईडी टीव्ही पळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 18:02 IST2017-09-02T18:01:43+5:302017-09-02T18:02:01+5:30

राहाता : शहरातील मध्यवर्ती ठिकाणी साईराज सेल्स या शोरुममधून अज्ञात चोरट्यांनी रोख रकमेसह पावणेसात लाख रुपये किमतीचे एलईडी टीव्ही ...

Lakhs of LED TVs were captured in Peshawar | पावणेसात लाखांचे एलईडी टीव्ही पळविले

पावणेसात लाखांचे एलईडी टीव्ही पळविले

राहाता : शहरातील मध्यवर्ती ठिकाणी साईराज सेल्स या शोरुममधून अज्ञात चोरट्यांनी रोख रकमेसह पावणेसात लाख रुपये किमतीचे एलईडी टीव्ही चोरल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली़
राहाता पोलीस ठाण्यात विनोद बाबासाहेब भोकरे (वय ३४, रा. कनकुरी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचे राहाता शहरात नगर-मनमाड मार्गालगत साईराज सेल्स हे शोरुम आहे़ शुक्रवारी रात्री ते आठ वाजण्याच्या सुमारास दुकान बंद करुन घरी गेले होते़
दरम्यान रात्री चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडून दुकानात प्रवेश केला़ गल्ल्यातील २० हजार रुपये रोख रकमेसह विविध कंपन्यांची एलईडी टीव्ही असा सुमारे ६ लाख ४१ हजार ७०९ रुपये किमतीचा ऐवज चोरुन पोबारा केला़ ही घटना सकाळी उघडकीस आली़ त्यानंतर भोकरे यांनी राहाता पोलिसांशी संपर्क करुन घटनेची माहिती दिली़ पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे़

Web Title: Lakhs of LED TVs were captured in Peshawar