कारमध्ये पकडली लाखाची दारू
By Admin | Updated: May 10, 2017 13:47 IST2017-05-10T13:47:27+5:302017-05-10T13:47:27+5:30
पोलिसांनी सलग तिसऱ्या दिवशी कारवाई सुरूच ठेवली आहे.एका कारमधून तब्बल ९१ हजार रूपयांची दारू जप्त केली आहे़

कारमध्ये पकडली लाखाची दारू
आॅनलाइन लोकमत
अहमदनगर, दि़ १० - शहरातील परवाना असलेल्या वाईनशॉपमधून अवैध दारू विक्री सुरूच असून, पोलिसांनी सलग तिसऱ्या दिवशी कारवाई सुरूच ठेवली आहे.एका कारमधून तब्बल ९१ हजार रूपयांची दारू जप्त केली आहे़ पाईपलाईन रोडवरील संदीप वाईनमधून सोनई येथे एका हॉटेलमध्ये ही दारू नेण्यात येत होती़ सोमवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली़
अवैध दारू विक्रीप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात चंदन बबनराव नलावडे (धनगरवाडी, सोनई), भगवंतराव गुलबराव गडाख (रा़ सोनई) व वाईनशॉपचा मालक संदीप वसंत बोरूडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पाईपलाईन रोडवरील वाईनशॉपमधून अवैधरित्या देशी दारू नेण्यात येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली होती़ सोमवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास फॉच्युर्नर कामरध्ये विदेशी दारूचे बॉक्स भरून ही दारू नगर-औरंगाबाद रोडकडे नेण्यात येत होती़ पथकाने पाईपलाईन रोडवरील श्रीराम चौकात ही कार ताब्यात घेऊन तपासणी केली असता आततध्ये दारूचे बॉक्स आढळून आले़ पथकाने दारू व कारसह एकूण २५ लाख ९१ हजार २०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला़