संगमनेरात राजकीय इच्छाशक्तीचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:21 IST2021-05-08T04:21:40+5:302021-05-08T04:21:40+5:30
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर शहरात कोरोना उपाययोजना करणाऱ्या पोलिसांवर जमाव हल्ला करतो, असा प्रश्न राहाता येथे पत्रकारांनी आमदार ...

संगमनेरात राजकीय इच्छाशक्तीचा अभाव
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर शहरात कोरोना उपाययोजना करणाऱ्या पोलिसांवर जमाव हल्ला करतो, असा प्रश्न राहाता येथे पत्रकारांनी आमदार विखे पाटील यांना विचारला होता. त्यावर विखे पाटील म्हणाले, संगमनेरात ना लोकप्रतिनिधींचा ना तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्थेचा लोकांना आधार वाटतो. मला असे वाटते संगमनेर तालुक्यात राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आहे. त्या तालुक्यातील जनतेला वाऱ्यावर सोडून दिले आहे. त्याचा परिणाम जनतेनेच आता यंत्रणा हातात घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. संगमनेरच्या लोकप्रतिनिधींचा संवाद कमी पडला आहे, त्यामुळे त्यांना माझी विनंती आहे की, त्यांनी केंद्र सरकारवर बोलण्यापेक्षा आपल्या मतदारसंघाकडे लक्ष द्यावे. तिथे सामान्य माणसांची फरपट चालली आहे. त्यांना आधार द्यावा.
------------