कुलभूषण जाधव कुटुंबीयांना पाकमध्ये दिलेल्या अपमानास्पद वागणुकीचा निषेध, शिर्डीतून पाकिस्तानी दुतावासाला जुन्या चपलांची भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2017 14:54 IST2017-12-28T14:54:45+5:302017-12-28T14:54:59+5:30
पाकिस्तानने अटक केलेले भारताचे सुपूत्र कुलभूषण जाधव यांना भेटायला त्यांची आई व पत्नी गेले असता, त्यांना तेथे अतिशय वाईट वागणूक मिळाली. या घटनेची जगभरातून निंदा होत असतांना शिर्डीतील तरुणांनी आज नागरिकांकडून जुन्या चप्पल गोळा करून पाकिस्तानी दुतावासाला कुरीयरने पाठवत आपला संताप व्यक्त केला.

कुलभूषण जाधव कुटुंबीयांना पाकमध्ये दिलेल्या अपमानास्पद वागणुकीचा निषेध, शिर्डीतून पाकिस्तानी दुतावासाला जुन्या चपलांची भेट
शिर्डी- पाकिस्तानने अटक केलेले भारताचे सुपूत्र कुलभूषण जाधव यांना भेटायला त्यांची आई व पत्नी गेले असता, त्यांना तेथे अतिशय वाईट वागणूक मिळाली. या घटनेची जगभरातून निंदा होत असतांना शिर्डीतील तरुणांनी आज नागरिकांकडून जुन्या चप्पल गोळा करून पाकिस्तानी दुतावासाला कुरीयरने पाठवत आपला संताप व्यक्त केला.
कुलभूषण जाधव यांची आई व पत्नी त्यांना भेटण्यासाठी गेल्या असतांना त्यांचे मंगळसूत्र, कुंकू एवढेच काय तर त्यांची चप्पल सुध्दा काढायला लावली व ती परत सुद्धा केली नाही. पाकिस्तानच्या या अमानवी वागणुकीबद्दल प्रचंड चीड व्यक्त होत आहे. अगोदरच कुलभूषण जाधव यांना अनेक दिवसांपासून अटक करून टॉर्चर केले जात आहे. त्यात कुटुंबीयांना दिलेल्या घाणेरड्या वागणुकीचे तिव्र पडसाद उमटले. या पार्श्वभूमीवर शिर्डीतील तरुणांनी आज एकत्र येत शहरासह मंदीर परिसरातून फेरी काढली. यावेळीत त्यांनी नागरिकांना आपल्या घरातील फाटलेले, खराब झालेले बुट, चप्पल पाकिस्तानी दुतावासाला पाठवण्यासाठी जमा करण्याचे आवाहन केलं. नागरिकांनीही या आवाहानला प्रतिसाद देत आपल्याकडच्या जुन्या चप्पल,बुट कार्यकर्त्यांकडे दिल्या़
पाकिस्तानला चपलांची फार गरज आहे असे या घटनेतुन वाटते त्यामुळे आम्ही पाकीस्तानी दुतावासाला जुन्या चप्पल, बुटांची भेट पाठवत आहोत, तसेच पाकिस्तान सरकारला पत्र पाठवून त्यांचं वागण मानवतेला धरुन नसल्याची जाणीवही करून देणात आहोत असे विशाल कोळपकर व गोपी परदेशी यांनी सांगितले. या आंदोलनात योगेश कुमावत, विराट पुरोहित, परीमल वेद, आकाश त्रिपाठी, रवि वैद्य, संदीप रोकडे, भैया रासने, मयुर चोळके, चेतन कोते आदी तरुण सहभागी झाले होते. यावेळी पाकीस्तान निषेधाच्या घोषणाही देण्यात आल्या.