शेतीच्या वादातून कुटुंबावर कु-हाडीने हल्ला; तीन जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 17:17 IST2020-07-08T17:16:31+5:302020-07-08T17:17:13+5:30
नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे शेतीच्या वादातून आठ जणांनी कुटुंबावर कु-हाड व लोखंडी गजाने हल्ला करून त्यांना जखमी केले. ६ जुलै रोजी दुपारी बारा वाजता ही घटना घडली.

शेतीच्या वादातून कुटुंबावर कु-हाडीने हल्ला; तीन जखमी
अहमदनगर: नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे शेतीच्या वादातून आठ जणांनी कुटुंबावर कु-हाड व लोखंडी गजाने हल्ला करून त्यांना जखमी केले. ६ जुलै रोजी दुपारी बारा वाजता ही घटना घडली.
याप्रकरणी साहेबराव बबनराव बोडखे यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून बाळासाहेब नानाभाऊ बोडखे, संगीता बाळासाहेब बोडखे, वैभव बाळासाहेब बोडखे, नितीन बाळासाहेब बोडखे व इतर चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या मारहाणीत फिर्यादी साहेबराव बोडखे, फिर्यादीचा मुलगा भरत व भावजई वीना रामदास बोडखे हे जखमी झाले आहेत. जखमींवर नगर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलीस नाईक गायकवाड हे पुढील तपास करीत आहेत.