शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

कोयता हाच देव... उसाचे थळ हेच मंदिर; ऊस तोडणी मजुरांची भावना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 12:03 IST

लेकरांचे भविष्य घडविण्यासाठी मुकादमाकडून उचल घेऊन वर्षातील सहा महिने कारखान्यावर ऊस तोडायला यावे लागते. अशी भावना ऊस तोडणी मजुरांनी ‘लोकमत’ प्रतिनिधीकडे व्यक्त केली. कोयता हाच देव, उसाचे थळ हेच मंदिर अन् सपासप ऊस तोडणी करणे हीच पूजा या भावनेतून आम्ही काम करतो, असेही त्यांनी सांगितले.

अनिल साठे । शेवगाव : गावाकडे सततचा दुष्काळ पाठीला पूजलेला, पाण्याअभावी रानं पडीक पडले आहेत, हाताला काम नाही. लेकरांचे भविष्य घडविण्यासाठी मुकादमाकडून उचल घेऊन वर्षातील सहा महिने कारखान्यावर ऊस तोडायला यावे लागते. अशी भावना ऊस तोडणी मजुरांनी ‘लोकमत’ प्रतिनिधीकडे व्यक्त केली. कोयता हाच देव, उसाचे थळ हेच मंदिर अन् सपासप ऊस तोडणी करणे हीच पूजा या भावनेतून आम्ही काम करतो, असेही त्यांनी सांगितले.‘लोकमत’ प्रतिनिधीने गंगामाई (ता. शेवगाव) साखर कारखान्याच्या एका सात कोयत्याच्या टोळीत ऊस तोडणी मजुरांच्या सानिध्यात दोन दिवस राहुन त्यांचे काम अनुभवले. मजूर हे चिंचपूर (ता. पाथर्डी) येथील होते. त्यांच्यासोबत काम करून त्यांच्या व्यथा, अडचणी जाणून घेतल्या. वीज, पाणी, स्वच्छता गृह, किराणा, पंक्चर दुकान, हॉटेल, कटाई, पिठाची गिरणी आदी सुविधा कारखाना परिसरात होत्या. मात्र आरोग्य, प्राथमिक उपचार, जनावरांचा डॉक्टर, साखर शाळा आदी सुविधांचा अभाव दिसला. वाहनांची रहदारी असलेल्या रस्त्यावर पुरेशी वीज व्यवस्था होती. मात्र कामगारांच्या कोप्या भोवताली अंधारच होता.ऊस तोडणी मजुरांचा दिवस मध्य प्रहरी एकच्या सुमारास होतो. महिला उठून न्याहारीसाठी सायंकाळी केलेली भाकरी, भाजी कापडी फडक्यात बांधून घेतात. सोबत पिण्यासाठी पाणी दुधाच्या कॅनमधे घेतले जाते  अन् सुरू होतो उसाच्या फडाकडे प्रवास. मुकादम विष्णू दशरथ बडे यांच्यासह टोळीतील त्यांचे सहकारी बुवासाहेब बडे, अशोक त्रिंबक बडे, गणेश आजीनाथ बडे, संजय होडशीळ, शाहीराम महादेव बडे, मारुती अर्जुन कावळे हे पत्नीसह कारखान्यापासून रात्री १ वाजून ३६ मिनिटांनी घोटण, खुंटेफळमार्गे दादेगावकडे बैलगाड्यांचा ताफा घेऊन निघाले. पहाटे ४ वाजता उसाच्या फडावर पोहोचले. तेथे बैलांना वाढे टाकून सर्वांनी कोयत्याने सापसप ऊस तोडायला सुरवात केली. प्रत्येक जोडप्याने सºया वाटून घेतल्या होत्या. सकाळी सूर्य उगवल्यावर सातच्या सुमारास ऊस तोडायचे थांबवले. महिलांनी उसापासून वेगळे केलेले वाढे गोळा करत पेंढ्या बांधण्यास सुरवात केली. पुरुषांनी ऊस बांधत बैल गाडीत टाकण्यास सुरवात केली. मध्ये पाच मिनिटाचा ब्रेक घेत सोबत आणलेले बिस्किट पाण्याबरोबर खाल्ले व पुन्हा काम सुरू केले. पुरुष मंडळींइतकीच मेहनत महिलाही घेत होत्या.दहाच्या सुमारास गाडीत भरलेला ऊस दोरीच्या सहाय्याने बांधत बैलांना जुंपले. पुन्हा कारखान्याकडे परतीचा प्रवास सुरू झाला. प्रवासात न्याहारी करत दुपारी साडेबाराच्या सुमारास कारखान्याच्या वजन काट्यावर गाड्या पोहोचल्या. जवळपास सगळ्यांनी दोन टन ऊस गव्हाणीत टाकला होता. ९०० ते १००० रूपयांची कमाई झाली होती. ती कमाई दोघांची नव्हती तर चौघांची होती. दोन टनापेक्षा जास्त ओझे बैलांच्या मानगुटीवर होते. त्यांचीही मेहनत त्यात होती. बारा तासात प्रत्येकाने २०० ते २५० रूपये कमावले होते. कोपीमध्ये परतल्यावर बैलाच्या पाठीवर थाप टाकून प्रत्येकाने त्यांना पेंड खायला दिली.बैलगाडीचे कार्यक्षेत्र १७ किलोमीटरचे...कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील १७ किमीपर्यंतच ऊस टायर बैल गाडीला आणता येतो. ऊस तोडणे आणि भरणे यासाठी १२ किलोमीटरला प्रतिटन ४४०.४ रूपये मिळतात. वाढीव प्रत्येक किलोमीटर मागे १२ रूपये जास्त मिळतात. ट्रॅक्टर, जिटी, ट्रक वरील टोळ्यांना वेगळा दर मिळतो. ऊस तोडणे व भरणे यासाठी ट्रॅक्टर टोळीला प्रतिटन २६७ रूपये मिळतात. ऊस खाली करण्यासाठी प्रत्येकाच्या वेगळ्या रांगा व नंबर दिला जातो.कोणत्याच योजनेबद्दल माहिती नाहीऊस तोडणी मजुरांच्या योजनांबद्दल किंचितही कल्पना त्यांना नव्हती. केवळ ऊस तोडायचा, किती वजन भरले अन् किती रूपये मिळाले इतकेच त्यांच्या रोजच्या जगण्यातील गणित आहे. कष्ट करतांना मोलाची साथ देणाºया बैलाच्या जोडीची प्रचंड काळजी त्यांच्यात दिसली.घेतलेली उचल फे डायची कशी?बहुतांश मजूर जोडप्यांनी मुलांना घरी आई, वडिलांच्या जवळ ठेवलेले होते. काहींनी वसतिगृहामध्ये ठेवले होते. उसाच्या कमतरतेमुळे गळीत हंगाम यंदा लवकर उरकणार याची चिंता सतावत होती. मुकादमाकडून घेतलेली उचल फेडायची तरी कशी अन् पट्टा पडल्यावर घरी जाऊन करायचे तरी काय? महिनाभरानंतर दुसरे काम शोधावे लागणार या काळजीत मजूर दिसत होते. लोकमत प्रतिनिधी २७ तास उसाच्या थळात‘लोकमत’ प्रतिनिधी अनिल साठे हे गंगामाई (ता. शेवगाव) साखर कारखान्याच्या एका सात कोयत्याच्या टोळीत ऊस तोडणी मजुरांच्या सानिध्यात तब्बल २७ तास राहिले. त्यांच्यासोबत राहुन मजुरांचे काम अनुभवले. चिंचपूर (ता. पाथर्डी) येथील मजूर त्यांच्यासोबत होते. त्यांच्यासोबत काम करून, त्यांच्यासोबत भाजी-भाकरी खात त्यांच्या व्यथा, अडचणी जाणून घेतल्या. अंधार, रात्रीची थंडी मजुरांसोबत अनुभवत त्यांचे जीवन किती खडतर आहे, प्रत्यक्ष अनुभवले. त्यांच्या या आपुलकीचे मजुरांनीही कौतुक केले.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेShevgaonशेवगावLabourकामगार