भंडारदरा येथे कोविड सेंटर सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:18 IST2021-05-17T04:18:59+5:302021-05-17T04:18:59+5:30

आदिवासी भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन आदिवासी भागातील नऊ गाव डांगणचे मध्यवर्ती ठिकाण शेंडी (भंडारदरा) येथे यशवंत युथ ...

Kovid Center will be started at Bhandardara | भंडारदरा येथे कोविड सेंटर सुरू होणार

भंडारदरा येथे कोविड सेंटर सुरू होणार

आदिवासी भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन आदिवासी भागातील नऊ गाव डांगणचे मध्यवर्ती ठिकाण शेंडी (भंडारदरा) येथे यशवंत युथ फाउंडेशनच्या माध्यमातून शासकीय मुलींचे वसतिगृह येथे ५० बेडचे कोविड सेंटर व प्राथमिक आरोग्य केंद्र शेंडी येथे १० ऑक्सिजन बेडचे कोविड सेंटर सुरू करण्यात येणार आहे. अशोक भांगरे म्हणाले की, शहरी भागाप्रमाणे आदिवासी भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. कोविड सेंटर येथे रुग्णांना चहा, नाष्टा, भोजन, लागणारी औषधे व उपचार मोफत करण्यात येणार आहे. वैद्यकीय अधिकारी डाॅ. संतोष चोळखे, तलाठी अजय साळवे, ग्रामसेवक दत्तात्रय जंगाले, वसतिगृह प्रमुख भोसले, डॉ. कल्याण गोयल, डॉ. प्रमोद कोंढावळे, डॉ. दिलीप बागडे, डॉ. बी. एम. कोतकर, डॉ. सुधीर कोटकर, डॉ. संदीप पर्बत उपस्थित होते.

Web Title: Kovid Center will be started at Bhandardara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.