बोधेगावात कोरोनाग्रस्तांसाठी उभारले कोविड सेंटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:20 IST2021-04-18T04:20:00+5:302021-04-18T04:20:00+5:30

बोधेगाव : ग्रामीण भागातील कोरोनाग्रस्त रुग्णांची हेळसांड होऊ नये. रुग्णांना अत्यल्प दरात उपचार मिळावेत, यासाठी शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील ...

Kovid Center for Corona victims in Bodhegaon | बोधेगावात कोरोनाग्रस्तांसाठी उभारले कोविड सेंटर

बोधेगावात कोरोनाग्रस्तांसाठी उभारले कोविड सेंटर

बोधेगाव : ग्रामीण भागातील कोरोनाग्रस्त रुग्णांची हेळसांड होऊ नये. रुग्णांना अत्यल्प दरात उपचार मिळावेत, यासाठी शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील काही खासगी डाॅक्टरांनी एकत्र येऊन गावातच ऑक्सिजनसह १५ बेडची व्यवस्था असणारे सुविधायुक्त कोविड सेंटर उभारले आहे.

सध्या कोरोनाचा विळखा अधिकच घट्ट होत असल्याने कोरोनाग्रस्त रुग्णांची उपचारासाठी नगर तसेच इतर शहरांत धावाधाव करताना दमछाक होत आहे. अनेक ठिकाणी बेड मिळणे मुश्कील बनले आहे. अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील रुग्णांना शासकीय निर्देशांपेक्षाही अत्यल्प दरात उपचार मिळावेत, यासाठी बोधेगाव येथील डाॅ. प्रमोद जाधव, डाॅ. मनोज पारीख, डाॅ. चंद्रशेखर घनवट, डाॅ. अजय कुलकर्णी, डाॅ. राजेंद्र कणसे, डाॅ. रिंकू घुले, डाॅ. अरुण भिसे, डाॅ. निलेश मंत्री, डाॅ. परमेश्वर गलांडे, डाॅ. दीपक फुंदे, डाॅ. दीपक जैन, डाॅ. ज्ञानेश्वर देशमुख, डाॅ. अविनाश पुंडे, डाॅ. साजीद पठाण, डाॅ. विजय कुलकर्णी आदी १५ डाॅक्टरांनी मिळून स्वखर्चाने लाडजळगावफाटा येथील एन.के. काॅम्प्लेक्समध्ये बोधेश्वर कोविड सेंटर नावाने सर्व सुविधायुक्त असे कोविड सेंटर उभारले आहे. याठिकाणी सध्या पाच स्वतंत्र कक्षांत १५ बेड आहेत. पैकी १० ऑक्सिजन बेड आहेत.

यावेळी केदारेश्वरचे उपाध्यक्ष डाॅ. प्रकाश घनवट, संतोष केसभट, अकिल बागवान आदींसह डाॅक्टर टीमचे सदस्य उपस्थित होते.

...

मोनिका राजळेंकडून कौतुक

शनिवारी (दि.१७) आमदार मोनिका राजळे यांच्या हस्ते या कोरोना सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. पाहणीदरम्यान आमदार राजळे यांनी ग्रामीण भागात उभारलेल्या या सुविधेसाठी संबंधित डाॅक्टरांचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या. गरजेनुरूप आवश्यक मदतीचे आश्वासन दिले.

...

१७बोधेगाव राजळे

...

ओळी- शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे खासगी डॉक्टरांनी सुरू केलेल्या खासगी कोविड सेंटरची पाहणी करताना आमदार मोनिका राजळे. समवेत डॉक्टर.

Web Title: Kovid Center for Corona victims in Bodhegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.