कोविडमुळे प्रवासी वाहतुकीला ब्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:21 IST2021-07-28T04:21:53+5:302021-07-28T04:21:53+5:30
कोविडच्या पहिल्या लाटेतील लॉकडाऊनमध्ये नागरिकांच्या प्रवासावर बंदी होती. त्यामुळे ऑटो व टॅक्सी चालक रस्त्यावर येऊन व्यवसाय करू शकले नाहीत. ...

कोविडमुळे प्रवासी वाहतुकीला ब्रेक
कोविडच्या पहिल्या लाटेतील लॉकडाऊनमध्ये नागरिकांच्या प्रवासावर बंदी होती. त्यामुळे ऑटो व टॅक्सी चालक रस्त्यावर येऊन व्यवसाय करू शकले नाहीत. त्यानंतरही ५० टक्के प्रवाशांची अट तोट्याची होती. त्यातून पेट्रोल व डिझेलचा खर्चही मिळणार नव्हता. त्यामुळे नाईलाजाने टॅक्सी चालक बांधकाम मजुरी व भाजीपाला विक्रीसारख्या व्यवसायांकडे वळाले. अनेकांनी कर्ज घेऊन खरेदी केलेली वाहने हप्ते थकल्याने बँकांनी जप्त केली.
---------
राज्यातील परवानाधारक रिक्षा चालकांना सरकारने दीड हजार रुपये अर्थसाहाय्य करण्याची घोषणा केली होती. मात्र, अद्यापही अनेकांना हे पैसे प्राप्त झाले नाही, असे जिल्हा टॅक्सी असोसिएशनचे अध्यक्ष सुनील मुथ्था यांचे म्हणणे आहे.
-------------
वाहन विक्रीला ब्रेक
श्रीरामपूर येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील प्राप्त आकडेवारीनुसार २०२०-२१ या आर्थिक वर्षात वाहन विक्री मंदावली आहे. मात्र, पुढील वर्षाकरिता वाहन विक्रीत वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
-----------
दुचाकी-चारचाकी वाहनांची विक्री
२०१९-२०
दुचाकी : ३८,०५६
चारचाकी : ३,१६०
२०२०-२१
दुचाकी : २१,३४९
चारचाकी : २,७६२
२०२१-२२
४५३ चार चाकी वाहनांची नोंद
-------
या वर्षातील एप्रिल ते जून महिन्यातील वाहनांची विक्री काहीशी कमी दिसत आहे. मागील वर्षी या काळात विक्री अधिक होती. मात्र, कोविडमुळे लोकांचा स्वत:चे वाहन खरेदीकडे कल वाढण्याची शक्यता आहे. पुढील वर्षाकरिता चारशेहून अधिक चारचाकींची नोंदणी झाली आहे.
- गणेश डगळे, सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, श्रीरामपूर.
----------
कोविडमुळे आरोग्याबाबत कोणतीही जोखीम पत्करण्याची माझी तयारी नाही. महत्त्वाच्या कामांनिमित्त प्रवास करतो. त्यामुळे स्वत:ची कार खरेदी केली आहे. कुटुंबाची सुुरक्षितता त्यामुळे जपली जाते.
ॲड.अमोल बाठीया, व्यावसायिक, श्रीरामपूर.
---------