कोटमारा धरण ‘ओव्हर फ्लो’
By Admin | Updated: August 26, 2014 01:53 IST2014-08-26T00:58:16+5:302014-08-26T01:53:43+5:30
संगमनेर : गेल्या आठवडाभरापासून पठार भागात चांगला पाऊस होत असल्याने कोटमारा धरण ‘ओव्हर फ्लो’ झाले आहे. ४कोटमारा धरणाची क्षमता ६०० द.ल.घ.फू. इतकी आहे.

कोटमारा धरण ‘ओव्हर फ्लो’
संगमनेर : गेल्या आठवडाभरापासून पठार भागात चांगला पाऊस होत असल्याने कोटमारा धरण ‘ओव्हर फ्लो’ झाले आहे.
४कोटमारा धरणाची क्षमता ६०० द.ल.घ.फू. इतकी आहे. पठार भागातील अनेक गावांना या धरणातील पाण्याचा फायदा होतो.
४ कितीही कमी-जास्त पाऊस झाला तरी दरवर्षी पावसाळ्यात धरण नेहमी जुलै महिन्यात भरते. मागील वर्षी देखील जुलै महिन्यातच धरण भरले होते.
४यंदा पावसाळ्यास प्रारंभ होवूनही पठार भागात पाऊस पडला नव्हता. मात्र मघा नक्षत्रात झालेल्या दमदार पावसाने धरणात प्रचंड पाणी आले. बदगी बेलापूर (अकोले) परिसरातील छोटे-मोठे बंधारे भरभरून वाहते झाल्याने त्याचे पाणी कोटमारा धरणात आले.
४त्यामुळे धरण पूर्ण क्षमतेने भरून ‘ओव्हर फ्लो’ झाले. या धरणाच्या पाण्यावर कुरकुटवाडी, आंबी दुमाला, बोटा, तळपेवाडी, शेळकेवाडी आदी परिसराला होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. भाग्यश्री नरवडे, लहू नरवडे, सावकार शिंदे, सयाजी ढेरंगे, सुरेश हांडे, शकुंतला कुरकुट यांनी धरणावर जावून जलपूजन केले.