कोपरगावचा कांदा दुबईच्या बाजारात
By Admin | Updated: July 25, 2016 00:07 IST2016-07-24T23:48:32+5:302016-07-25T00:07:40+5:30
कोपरगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील दोघा व्यापाऱ्यांनी थेट दुबईला कांदा पाठवला आहे.

कोपरगावचा कांदा दुबईच्या बाजारात
कोपरगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील दोघा व्यापाऱ्यांनी थेट दुबईला कांदा पाठवला आहे.
कोपरगाव येथील व्यापारी ऋषिकेश सांगळे व मोसीन रियाज अहमद खान या दोन तरूण व्यापाऱ्यांनी एकत्र येऊ रविवारी २६ टन कांदा कोपरगाव येथून मुंबई मार्गे दुबईच्या बाजापेठेत पाठविला. कोपरगाव तालुक्यातून विदेशात कांदा पाठविण्याची ही पहिलीच वेळ आहे. शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या कांद्याला उत्तम प्रकारे पॅकिंग करून ५० एमएमच्या आकाराचा कांदा, आकर्षक गोणीत २० किलोप्रमाणे पॅक करण्यात आला आहे, अशी माहिती सांगळे यांनी दिली. अशा प्रकारे विदेशात आपण पहिल्यांदाच विक्रीसाठी कांदा पाठवित आहोत. भविष्यात कोपरगावचा आणखी माल विदेशी बाजारपेठेत पोहोचविण्याचा आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगळे म्हणाले. दरम्यान, कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष मधुकर टेके, सचिव पवार, कर्मचारी, व्यापारी, संघटनेच्या वतीने ऋषिकेश सांगळे, मोसीन रियाज अहमद खान यांचे अभिनंदन करण्यात आले.
(प्रतिनिधी)