शब्दगंध साहित्यिक परिषदेची कोपरगाव तालुका कार्यकारिणी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:17 IST2021-01-14T04:17:16+5:302021-01-14T04:17:16+5:30

कोपरगाव : शब्दगंध साहित्यिक परिषदेचे संस्थापक सुनील गोसावी यांनी नुकतीच कोपरगाव येथील हिंदी वाचनालयात पार पडलेल्या कवी संमेलनात कोपरगाव ...

Kopargaon taluka executive committee of Shabdagandh Sahitya Parishad announced | शब्दगंध साहित्यिक परिषदेची कोपरगाव तालुका कार्यकारिणी जाहीर

शब्दगंध साहित्यिक परिषदेची कोपरगाव तालुका कार्यकारिणी जाहीर

कोपरगाव : शब्दगंध साहित्यिक परिषदेचे संस्थापक सुनील गोसावी यांनी नुकतीच कोपरगाव येथील हिंदी वाचनालयात पार पडलेल्या कवी संमेलनात कोपरगाव तालुका कार्यकारिणी जाहीर केली आहे.

याप्रसंगी शब्दगंधचे उपाध्यक्ष कवी सुभाष सोनवणे, प्रसिद्धी प्रमुख राजेंद्र फंड, रवींद्र धस आदी मान्यवर उपस्थित होते. या नूतन कार्यकारिणीमध्ये अध्यक्षपदी कैलास साळगट, उपाध्यक्ष ऐश्वर्या सातभाई व सुधीर कोयटे, कार्याध्यक्ष प्रा. डॉ. संजय दवंगे, सहकार्याध्यक्ष संदीप बागल, सचिव प्रा. मधुमीता निळेकर, सहसचिव वंदना चिकटे, खजिनदार प्रमोद येवले, सल्लागार भानुदास बैरागी व राम गायकवाड, पद्माकांत कुदळे यांची निवड करण्यात आली. तर कार्यकारिणी सदस्य म्हणून अशोक आव्हाटे, शैलजा रोहम, श्रीकांत बागुल, नंदकिशोर लांडगे, स्वाती मुळे, श्वेतांबरी राऊत, हेमचंद्र भवर, रवींद्र कांबळे यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी सुनील गोसावी, सुभाष सोनवणे, राजेंद्र फंड, सुधीर कोयटे, वंदना चिकटे यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच शब्दगंध साहित्यिक परिषदेच्यावतीने ग्रंथालयास पुस्तके भेट देण्यात आली. प्रास्ताविक कैलास साळगट यांनी केले तर प्रमोद येवले यांनी आभार मानले.

...............

फोटो

........

फोटो१४ कवी

- साहित्यिक परिषद नवनिर्वाचित पदाधिकारी फोटो नॉर्थवर मेल केला आहे.

Web Title: Kopargaon taluka executive committee of Shabdagandh Sahitya Parishad announced