कोपरगाव बाजार समितीचा जनावरांचा बाजार पूर्ववत सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:25 IST2021-09-05T04:25:00+5:302021-09-05T04:25:00+5:30
कोल्हे म्हणाल्या, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव बाजार समितीचा जनावरांचा बाजार बंद होता, त्यामुळे अनेक अडचणी तयार झाल्या होत्या. त्यासाठी ...

कोपरगाव बाजार समितीचा जनावरांचा बाजार पूर्ववत सुरू होणार
कोल्हे म्हणाल्या, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव बाजार समितीचा जनावरांचा बाजार बंद होता, त्यामुळे अनेक अडचणी तयार झाल्या होत्या. त्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अहमदनगर यांच्याकडे आपण सातत्याने पाठपुरावा केला त्याला यश आले आहे. त्यांनी हा जनावरांचा बाजार ६ सप्टेंबरपासून पूर्ववत सुरू करावा म्हणून आदेश दिले आहेत. कोपरगाव बाजार समिती आवारात आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध आहे, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने सर्व तयारी बाजार समिती आवारात करण्यात आलेली आहे.
सर्व नियम पाळून जनावरांचा बाजार पूर्ववत सुरू करण्यासाठी आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण झाल्याचे बाजार समितीचे सभापती संभाजी रक्ताटे, उपसभापती राजेंद्र निकोले व सर्व संचालक मंडळाने सांगितले. तरी शेतकरी, व्यापारी वर्गाने याचा लाभ घ्यावा असे आवाहन बाजार समितीच्यावतीने करण्यात आले आहे.