कोल्हाटी समाजाचा मोर्चा
By Admin | Updated: August 21, 2014 23:05 IST2014-08-21T22:59:40+5:302014-08-21T23:05:28+5:30
राज्य कोल्हाटी समाजाच्यावतीने गुरुवारी जामखेड तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा नेण्यात आला.

कोल्हाटी समाजाचा मोर्चा
जामखेड : सोलापूर येथे बालरुग्ण विभागात प्रशिक्षण घेत असलेले डॉ. किरण जाधव यांच्या आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी, या प्रमुख मागणीसाठी राज्य कोल्हाटी समाजाच्यावतीने गुरुवारी जामखेड तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा नेण्यात आला.
मोर्चात कोल्हाटी समाजातील महिला, पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चा तहसील कार्यालयावर गेल्यानंतर मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. यावेळी राज्य कोल्हाटी समाजाचे अध्यक्ष ऋतुराज काळे, नगरसेवक अभिजात काळे (बारामती), केजचे रत्नाकर शिंदे, सरपंच राम अंधारे (बोधेगाव), कॉ. बाबा आरगडे, चंद्रकांत जाधव (पंढरपूर), यादव काळे (श्रीरामपूर), लोकाधिकार आंदोलनाचे अध्यक्ष अरुण जाधव, अमित जाधव, शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रा. मधुकर राळेभात यांची भाषणे झाली.
यावेळी दत्तात्रय वारे, राजेंद्र कोठारी, दिलीप बाफना, शामीर सय्यद, सनी सदाफुले, बापू गायकवाड, अनिता काळे, शिवकन्या कंधारे यांनी या घटनेचा निषेध करुन डॉ. किरण जाधव यांना श्रध्दांजली अर्पण केली.
(तालुका प्रतिनिधी)