कोळगावात शेतकऱ्याचे छप्पर जळून खाक,गॅस टाकीचा स्फोट होऊन लागली आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2020 20:33 IST2020-05-01T20:31:43+5:302020-05-01T20:33:30+5:30
विसापूर- श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथे कोरोनाचे संकटाने जेरीस आलेल्या एका शेतकऱ्याच्या छप्पराला शुक्रवारी भर दुपारी दोन वाजता आग लागली.या आगीत या शेतकऱ्याचा संसार उघड्यावर आला आहे.

कोळगावात शेतकऱ्याचे छप्पर जळून खाक,गॅस टाकीचा स्फोट होऊन लागली आग
विसापूर- श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथे कोरोनाचे संकटाने जेरीस आलेल्या एका शेतकऱ्याच्या छप्पराला शुक्रवारी भर दुपारी दोन वाजता आग लागली.या आगीत या शेतकऱ्याचा संसार उघड्यावर आला आहे.
शुक्रवारी दुपारी कोळगाव येथे वडाळी रोडवर नाहायारमळा शिवरात रहात असलेल्या सुदाम रामकृष्ण दळवी यांचे छप्पराला आग लागली.या वेळी घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन आग लागल्याचे सांगण्यात आले.सुदैवाने घरात कोणीही व्यक्ति नसल्याने जिवीत हानी टळली.आग लागली त्यावेळी घरातील महिला जवळच असलेल्या शेतात काम करत होत्या.गॅस सिलिंडरचा स्फोट इतका भयंकर होता की या महिला व आसपासचे लोक धावत येऊन आग विझविण्यासाठी प्रयत्न करण्यापुर्वी संपूर्ण छप्पराने पेट घेतला होता.या आगीत सुदाम दळवी यांचा संपूर्ण संसार उघड्यावर आला आहे.यामध्ये घरातील ज्वारी,गहू,हरभरा हे धान्य,महिलांचे दागिने,रोख रक्कम व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले.सुदाम दळवी यांचा मुलगा योगेश याने घरात ठेवलेले सव्वा लाख रुपयांची कृषी उपयोगी औषधे जळून गेले आहेत.
Attachments area