नगरमध्ये वेटरवर चाकूने हल्ला; चौघांविरुध्द गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 15:37 IST2020-06-26T15:37:26+5:302020-06-26T15:37:50+5:30
हॉटेलमधून पाण्याची बाटली न दिल्याने चौघांनी वेटरवर चाकूने हल्ला करीत त्याला जखमी केले. गुरूवारी सायंकाळी साडेचार वाजता शहरातील प्रेमदान चौकातील हॉटेल वेदांत येथे ही घटना घडली.

नगरमध्ये वेटरवर चाकूने हल्ला; चौघांविरुध्द गुन्हा
अहमदनगर : हॉटेलमधून पाण्याची बाटली न दिल्याने चौघांनी वेटरवर चाकूने हल्ला करीत त्याला जखमी केले. गुरूवारी सायंकाळी साडेचार वाजता शहरातील प्रेमदान चौकातील हॉटेल वेदांत येथे ही घटना घडली.
या मारहाणीत जखमी झालेला वेटर कृष्णकुमार रामसिंगार कामत (वय १९) याने तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी करण सुनील भिंगारदिवे, अनुज धीवर, अभिषेक शिरसाठ व तेजस भगत यांच्या विरोधात आर्म अॅक्ट व मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वेटर कृष्णकुमार हा हॉटेलमध्ये बसलेले असताना वरील चौघेजण त्या ठिकाणी आले. त्यांनी वेटरला पाण्याची बाटली मागितली. बाटली शिल्लक नाही असे वेटरने सांगितल्यानंतर त्याला शिवीगाळ करीत आरोपींनी चाकूने व डोक्यात ग्लास मारून तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलीस नाईक पवार हे पुढील तपास करीत आहेत.