के.के.रेंज प्रश्नी मी शेतक-यांच्या बाजूने; संरक्षणमंत्र्यांना भेटून तोडगा काढूृ; शरद पवार यांचे आश्वासन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 13:20 IST2020-08-14T13:19:34+5:302020-08-14T13:20:53+5:30
के.के.रेंजचा परिसर मला माहित आहे. मी संरक्षणमंत्री असताना या परिसराची पाहणी केली होती. येथील जमिनी शेतक-यांनी विकसित केलेल्या आहेत. याबाबत मी शेतक-यांच्या बाजूने ठामपणे उभा आहे. या जमिनीचे कदापिही हस्तांतरण होऊ देणार नाही, असे आश्वासन राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळास दिले.

के.के.रेंज प्रश्नी मी शेतक-यांच्या बाजूने; संरक्षणमंत्र्यांना भेटून तोडगा काढूृ; शरद पवार यांचे आश्वासन
अहमदनगर : के.के.रेंजचा परिसर मला माहित आहे. मी संरक्षणमंत्री असताना या परिसराची पाहणी केली होती. येथील जमिनी शेतक-यांनी विकसित केलेल्या आहेत. याबाबत मी शेतक-यांच्या बाजूने ठामपणे उभा आहे. या जमिनीचे कदापिही हस्तांतरण होऊ देणार नाही, असे आश्वासन राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळास दिले.
१४ आॅगस्ट रोजी मुंबई येथे शरद पवार यांची आमदार निलेश लंके यांनी भेट घेतली. यावेळी पवार यांच्यासमोर के.के.रेंजसंदर्भात २३ गावातील शेतकºयांच्या जमिनींचा प्रश्न आमदार लंके यांनी उपस्थित केला. यावर आपणच तोडगा काढावा, असे साकडेही लंके यांनी पवारांना घातले. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे, सरपंच राहुल झावरे, गणेश हाके, धोंडिभाऊ टकले, सचिन पठार आदी उपस्थित होते.
के.के. रेंजसंदर्भात मी शेतक-यांच्या बाजूने ठामपणे उभा आहे. याबाबत आपण लवकरच दिल्ली येथे जाऊन संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेऊ. यावर लवकरच सकारात्मक तोडगा काढू, अशी ग्वाहीही शरद पवार यांनी यावेळी लंके यांना दिली.