शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

कीर्तनकाराने ओलांडली क्रौर्याची सीमा, अल्पवयीन मुलीला चटके देत अत्याचार; पारनेर तालुक्यातील घटना, आरोपीला पोलिस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 07:22 IST

यशवंत एकनाथ थोरात ऊर्फ अण्णासाहेब गुंजाळ (वय ३८), असे संशयित कीर्तनकाराचे नाव आहे.

पारनेर (जि. अहिल्यानगर): तालुक्यातील एका गावातील वारकरी शिक्षण संस्थेचा अध्यक्ष व कीर्तनकाराने मागील ५ वर्षांपासून अल्पवयीन मुलीला धाक दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. याबाबत पीडित मुलीच्या २२ वर्षीय भावाने पारनेर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून कीर्तनकाराला अटक करून त्याच्यावर ‘पोस्को’नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

यशवंत एकनाथ थोरात ऊर्फ अण्णासाहेब गुंजाळ (वय ३८), असे संशयित कीर्तनकाराचे नाव आहे. पारनेर पोलिसांनी रविवारी पहाटे ४ वाजता राहत्या घरातून त्याला अटक केली. जिल्हा न्यायालयाने २० मार्चपर्यंत आरोपीला पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक रणजीत मारग यांनी दिली.

कोणाला सांगितले तर जाळून टाकीन ड -फिर्यादीत म्हटले की, शालेय शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलीचा पाच वर्षांपूर्वी कीर्तनकार यशवंत एकनाथ थोरात ऊर्फ अण्णासाहेब गुंजाळ (महाराज) याने विनयभंग केला. ही मुलगी आरोपीच्या घरी आलेली असताना, त्याने अत्याचार केला तसेच हा प्रकार कोणाला सांगितल्यास तिचे आई-वडील व भावाला जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपीने वारंवार तिच्यावर अत्याचार केला. मात्र, भीतीपोटी तिने हा प्रकार कोणाला सांगितला नाही.

१० मार्च रोजी आरोपीने फोन करून मुलीला घरी बोलावले. तिने नकार दिला असता, आरोपीने तिला धमकावले. मुलगी घरी आल्यानंतर ‘तू लवकर का आली नाहीस’ असे म्हणून मारहाण केली. लोखंडी सांडशी गरम करून चटके दिले. त्यानंतर तिच्यावर पुन्हा अत्याचार केला. हा प्रकार कोणाला सांगितला, तर तुला जाळून टाकीन, घरात एकही माणूस ठेवणार नाही, अशी धमकी त्याने दिली.  

English
हिंदी सारांश
Web Title : Kirtankar Commits Heinous Acts: Minor Girl Tortured, Abused in Parner

Web Summary : A religious leader in Parner has been arrested for allegedly repeatedly abusing and torturing a minor girl over five years. The accused threatened to kill her family if she revealed the abuse, which included burning her with hot tongs. He is now in police custody.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस