किरण पाठक हिचा मृतदेह विहिरीत सापडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:14 IST2021-07-09T04:14:57+5:302021-07-09T04:14:57+5:30
बुधवारी (दि.७) दोनच्या सुमारास आपल्या घरातून किरण गणेश पाठक (वय १३) बेपत्ता झाली होती. परिसरात सगळीकडे शोध घेऊन ...

किरण पाठक हिचा मृतदेह विहिरीत सापडला
बुधवारी (दि.७) दोनच्या सुमारास आपल्या घरातून किरण गणेश पाठक (वय १३) बेपत्ता झाली होती. परिसरात सगळीकडे शोध घेऊन तपास केला असता ती कुठेही मिळून आली नाही. रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान वांबोरी दूरक्षेत्र येथे बेपत्ता मुलीचे वडील गणेश मनोज पाठक यांनी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. राहुरीचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ, पोलीस उपनिरीक्षक निलेशकुमार वाघ यांच्यासह पोलीस हवालदार चंद्रकांत बर्हाटे, पोलीस हवालदार दिगंबर चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल रमेश शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन बेपत्ता किरणचा शोध सुरू केला. गुरुवारी (दि. ८) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास वांबोरी- विळद रस्त्याच्या कडेला भारत जाधव यांच्या मालकीच्या विहिरीतील पाण्यावर किरणचा मृतदेह तरंगताना आढळून आले.
मयत किरण पाठक हिचा मृतदेह विहिरीतून वर काढून उत्तरीय तपासणीसाठी वांबोरी ग्रामीण रुग्णालय येथे पाठवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
..............
किरण पाठक