मी अकोले मतदारसंघातील जनतेसोबत-किरण लहामटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 12:00 IST2019-11-23T11:59:37+5:302019-11-23T12:00:28+5:30
अकोले तालुक्यातील जनता जो आदेश देईल, तो आदेश आपल्यासाठी महत्वाचा आहे. मी जनतेसोबत आहे, अशी प्रतिक्रिया आमदार डॉ.किरण लहामटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

मी अकोले मतदारसंघातील जनतेसोबत-किरण लहामटे
अहमदनगर : मुंबईत ज्या काही घडमोडी सुरू आहेत. त्या आपणही फक्त दूरचित्रवाहिनीवर पाहिल्या आहेत. अकोले तालुक्यातील जनता जो आदेश देईल, तो आदेश आपल्यासाठी महत्वाचा आहे. मी जनतेसोबत आहे, अशी प्रतिक्रिया आमदार डॉ.किरण लहामटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
लहामटे हे शुक्रवारी रात्री आळंदी येथे ज्ञानेश्वरांच्या दर्शनासाठी गेले होते. पहाटे ते मतदारसंघात परतले. ते झोपेत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शपथ घेतल्याची बातमी येऊन धडकली. कार्यकर्ते जेव्हा लहामटे यांच्या घरी गेले तेव्हा त्यांना या घडामोडींबाबत माहिती समजली. यावेळी लहामटे म्हणाले, आपण मतदारसंघात सक्रीय असून सत्ता स्थापनेबाबत काय निर्णय झाला याची काहीही कल्पना नाही. पक्षाने दुपारी बैठक बोलावली आहे. यासाठी मी मुंबईला निघालो आहे. आपणाला जनतेचा आदेश महत्वाचा आहे. जनता काय निर्णय देईल त्यानुसारच आपल्या सर्व भूमिका ठरतील, असेही लहामटे म्हणाले.