मध्यमेश्वर मंदिरातील पुजा-यांवर खुनी हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 17:43 IST2017-10-03T17:43:13+5:302017-10-03T17:43:25+5:30

श्री मध्यमेश्वर मंदिरातील दोन महाराजांवर अज्ञात चोरट्यांनी चोरीच्या उद्देशाने धारदार शस्त्राने खुनी हल्ला केला. यामध्ये हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नगरच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सोमवारी रात्री बाराच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, याप्रकरणी मंगळवारी सायंकाळी उशिरापर्यंत कोणालाही अटक झालेली नव्हती.

The killers of Pujas in Madhyameshwar temple | मध्यमेश्वर मंदिरातील पुजा-यांवर खुनी हल्ला

मध्यमेश्वर मंदिरातील पुजा-यांवर खुनी हल्ला

नेवासा : येथील श्री मध्यमेश्वर मंदिरातील दोन महाराजांवर अज्ञात चोरट्यांनी चोरीच्या उद्देशाने धारदार शस्त्राने खुनी हल्ला केला. यामध्ये हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नगरच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सोमवारी रात्री बाराच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, याप्रकरणी मंगळवारी सायंकाळी उशिरापर्यंत कोणालाही अटक झालेली नव्हती.
    याबाबत योगी केशवनाथ महाराज (मुळगाव भायगाव ता. शेवगाव) यांनी जबाबात म्हटले आहे, मी रात्री मंदिरा बाहेर झोपलो होतो. रात्री बाराच्या दरम्यान तहान लागल्याने आतील खोलीत गेलो असता तीन अज्ञात चोरट्यांनी खोलीत प्रवेश करुन पैसे कुठे आहेत? अशी विचारणा केली. मी कसले पैसे? असा प्रश्न केला असता चोरट्यांनी चाकूने माझ्यावर वार करण्यास सुरुवात केली. यामध्ये माझ्या  डाव्या हाताची नस कापली. खोली बाहेर झोपलेले माझे गुरू योगी लक्ष्मणनाथ महाराज (मुळगाव गोरखपूर,उत्तर प्रदेश) ओरडा ऐकून आतील खोलीत आले असता एका चोरट्याने त्यांच्यावर कु-हाडीच्या मागील बाजूने हल्ला केला. यामध्ये त्यांच्या पाठीवर व डोक्यावर जखमा झाल्या आहेत. चौथा हल्लेखोर मंदिराबाहेर होता, असे केशवनाथ महाराजांचे म्हणणे आहे.    पोलीस उपअधीक्षक अभिजित शिवथरे यांनी मंगळवारी सकाळी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्यादृष्टीने अधिका-यांना सूचना दिल्या. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश जांभळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

श्वानपथक, ठसे तज्ज्ञांची मदत
घटनेनंतर रात्री साडेबाराच्या सुमारास पोलीस घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी जखमींना नेवासा येथील रुग्णालयात दाखल केले. येथील प्राथमिक उपचारानंतर त्यांना नगरच्या जिल्हा रुग्णालयात हलविले. योगी केशवनाथ महाराजांच्या जखमांमधून मोठा रक्तस्त्राव झाल्याने  मंदिर परिसरात रक्ताचा सडा पडला होता. चोरट्यांच्या तपासासाठी श्वान पथक व ठसे तज्ञांची मदत घेण्यात आली. श्वान पथकाने मंदिरापासून बस स्थानाकापर्यंत सुमारे एक किलो मीटर अंतरापर्यंत माग काढला. 

Web Title: The killers of Pujas in Madhyameshwar temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.