मुंबईहून येणारे लोक विलगीकरणात ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:20 IST2021-04-18T04:20:14+5:302021-04-18T04:20:14+5:30
पारनेर : पारनेर तालुक्याच्या भागातील अनेक जण पुणे-मुंबईत आहेत. ते घराकडे आल्यास त्यांना विलगीकरण कक्षात ठेवा, असा आदेश महसूलमंत्री ...

मुंबईहून येणारे लोक विलगीकरणात ठेवा
पारनेर : पारनेर तालुक्याच्या भागातील अनेक जण पुणे-मुंबईत आहेत. ते घराकडे आल्यास त्यांना विलगीकरण कक्षात ठेवा, असा आदेश महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले.
पारनेर तालुका कोरोना आढावा बैठक शनिवारी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत गणेश मंगल कार्यालयात घेण्यात आली. यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, पारनेर तालुक्यात भाळवणी गावात कोरोना रुग्णांची संख्या कशी काय जास्त आहे, अशी विचारणा केली.
पहिल्या टप्प्यात भाळवणीत बाजारात गर्दी आणि महामार्गावर गाव असल्याने रुग्ण वाढल्याचे प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांनी सांगितले.
आमदार नीलेश लंके यांनी कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन, इंजेक्शन, औषधे यांचा पुरवठा करावा, अशी मागणी केली. यावेळी सोमवारी सर्व आढावा घेऊन मुख्यमंत्र्यांबरोबरच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित करणार आहोत, असे थोरात यांनी सांगितले.
पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके, बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड, शिवाजी शिर्के, राज चौधरी यांनी सूचना केल्या. यावेळी तहसीलदार ज्योती देवरे यांनी तालुक्यात कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची माहिती दिली. यावेळी आमदार सुधीर तांबे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रताप शेळके, बांधकाम सभापती काशीनाथ दाते, सभापती गणेश शेळके, संभाजी रोहोकले, श्रीकांत पठारे, तहसीलदार ज्योती देवरे, गटविकास अधिकारी किशोर माने, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे, मुख्याधिकारी सुनीता कुमावत उपस्थित होते.
.....
आमदार लंके यांच्यामुळे रुग्णांना दिलासा
आमदार नीलेश लंके यांनी कोविड सेंटर उभारल्यामुळे रुग्णांना दिलासा मिळाला आहे. त्यांनी मास्क वापरावे. त्यांची आम्हाला गरज आहे, असे मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
....