केडगाव शिवसैनिक हत्या प्रकरण-विशाल कोतकर, रवी खोल्लमला २७ एप्रिलपर्यंत कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 15:44 IST2018-04-24T15:44:04+5:302018-04-24T15:44:51+5:30
केडगाव येथील शिवसेनेचे पदाधिकारी संजय कोतकर व वसंत ठुबे यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेला काँग्रेस नगरसेवक विशाल कोतकर व रवी खोल्लम या दोघा आरोपींना मंगळवारी जिल्हा न्यायालयाने २७ एपिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

केडगाव शिवसैनिक हत्या प्रकरण-विशाल कोतकर, रवी खोल्लमला २७ एप्रिलपर्यंत कोठडी
अहमदनगर : केडगाव येथील शिवसेनेचे पदाधिकारी संजय कोतकर व वसंत ठुबे यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेला काँग्रेस नगरसेवक विशाल कोतकर व रवी खोल्लम या दोघा आरोपींना मंगळवारी जिल्हा न्यायालयाने २७ एपिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
विशाल कोतकर याला मंगळवारी पहाटे कामरगाव परिसरातून अटक करण्यात आली आहे. विशाल कोतकर हा हत्याकांडात संशयित मुख्य सूत्रधार असल्याचीही चर्चा आहे. आतापर्यंत या हत्याकांडात ९ जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. रवी खोल्लम याला पोलिसांनी गुरुवारी जेरबंद केले होते. त्याच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपत होती. त्यामुळे त्यालाही पोलिसांनी न्यायालयात हजर केले होते. आरोपींकडून हत्याकांडाबाबत अधिक माहिती मिळवायची आहे, त्यामुळे त्यांना पोलीस कोठडी मिळावी, अशी मागणी पोलिसांच्यावतीने करण्यात आली होती. त्यामुळे न्यायालयाने दोघांनाही २७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.