केडगावात पुन्हा हत्याकांड : युवकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 10:28 IST2018-12-16T10:28:38+5:302018-12-16T10:28:43+5:30

केडगावमध्ये पुन्हा एकदा वादातून एका युवकाचा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

Kedgah again murders: Youth murder | केडगावात पुन्हा हत्याकांड : युवकाचा खून

केडगावात पुन्हा हत्याकांड : युवकाचा खून

अहमदनगर : केडगावमध्ये पुन्हा एकदा वादातून एका युवकाचा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. संतोष कचरू पाचारणे (रा. केडगाव, वय- २५ वर्षे )या युवकाचा शनिवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास नगर- पुणे रोडवरील अंबिका हॉटेलजवळ खून झाला.
बाळू शांताराम पाचारणे याच्याशी संतोष यांचे वाद झाले. वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन बाळू यांनी मारहाण केल्याने संतोष यांला गंभीर दुखापत होऊन तो जागीच गतप्राण झाला. दोघेही केडगावमधील हॉटेल अंबिकाच्या मागील वस्तीत राहतात. या घटनेने केडगाव पुन्हा एकदा हादरले.

Web Title: Kedgah again murders: Youth murder