कारवाडी-पाचेगाव-गुजरवाडी रस्ता कामास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:14 IST2021-07-12T04:14:19+5:302021-07-12T04:14:19+5:30
नेवासा : मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या पाठपुराव्यामुळे नेवासा तालुक्यातील कारवाडी ते पाचेगाव या डांबरीकरण रस्त्याचे, तर ...

कारवाडी-पाचेगाव-गुजरवाडी रस्ता कामास सुरुवात
नेवासा : मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या पाठपुराव्यामुळे नेवासा तालुक्यातील कारवाडी ते पाचेगाव या डांबरीकरण रस्त्याचे, तर पाचेगाव ते गुजरवाडी या खडीकरण रस्त्याच्या कामाचा शुभारंभ उदयन गडाख यांच्या हस्ते शुक्रवारी सकाळी करण्यात आला.
नेवासा तालुक्यातील दुर्लक्षित रस्त्याच्या कामांना पाठपुराव्याद्वारे सातत्याने प्राधान्य देऊ व सर्वच कामे ही शंकरराव गडाखांच्या मार्गदर्शनाखाली मार्गी लावू, अशी ग्वाही उदयन गडाख यांनी दिली.
गडाख यांनी ग्रामविकास कार्यक्रमांतर्गत मंजूर केलेल्या २५ लाख रुपये खर्चाच्या कारवाडी ते पाचेगावकडे जाणाऱ्या एक किलोमीटर डांबरीकरण रस्त्याचे तसेच पाचेगाव ते गुजरवाडी या एक किलोमीटर अंतराच्या व १५ लाख रुपये खर्चाच्या खडीकरणाचे काम सुरू झाले. यावेळी पंचायत समितीचे सभापती रावसाहेब कांगुणे, पाचेगाव येथील शेतकरी नेते हरिभाऊ तुवर, दिगंबर नांदे, सुधाकर पवार, वामनराव तुवर, सोसायटीचे अध्यक्ष सुधाकर तुवर, पाचेगाव सोसायटीचे अध्यक्ष प्रकाश जाधव, सीताराम तुवर, परवेझ शेख, बादशहा शेख, निवृत्ती जाधव, हरिभाऊ जगताप, गोकुळ तुवर, रहेमान शेख, उल्हास शिंगोटे, सुधाकर तुवर, हारुण बेग, शकील बेग, मन्सूर शेख, गणेश घोगरे, बाळासाहेब शिंदे, दादा पवार, रवींद्र तुवर, सुधाकर शिंदे, बाळासाहेब शिंदे, राजेंद्र तुवर, बंडू रासकर, सीताभाऊ गवळी, दीपक धनगे, बाबासाहेब काळे, दीपक शिंदे आदी उपस्थित होते.