कर्जत : शॉक बसून चिमुकल्या बहिण-भावाचा दुर्देवी मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 17:54 IST2019-05-28T17:54:03+5:302019-05-28T17:54:19+5:30

शहरातील गवंडेगल्ली येथे सायंकाळी घराच्या छतावर खेळणा-या चिमुकल्या बहिण-भावांना विजेचा शॉक बसल्याने त्यांचा जागीत दुर्देवी मृत्यु झाला

Karjat: The death of brother-in-law and brother-in-law, due to a shock, is death | कर्जत : शॉक बसून चिमुकल्या बहिण-भावाचा दुर्देवी मृत्यू

कर्जत : शॉक बसून चिमुकल्या बहिण-भावाचा दुर्देवी मृत्यू

कर्जत : शहरातील गवंडेगल्ली येथे सायंकाळी घराच्या छतावर खेळणा-या चिमुकल्या बहिण-भावांना विजेचा शॉक बसल्याने त्यांचा जागीत दुर्देवी मृत्यु झाला. यामुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
कर्जत शहरातील गवंडेगल्ली येथे एक कुटुंब भाड्याने राहतात. काल (ता.२७) रोजी सायंकाळी आर्यन विनयकुमार निसार (वय-५)व जानव्ही विनयकुमार निसार (वय-३) हे बहिण भाऊ घराच्या छतावर खेळण्यासाठी गेली होती. मुले बराच वेळ झाल्याने खाली का आली नाहीत म्हणून त्यांच्या आईने वर जाऊन पाहिले. त्यावेळी त्यांना विजेचा शॉक बसल्यामुळे बेशुद्ध अवस्थेत दिसून आल्याने त्यांना रुग्नालयात दाखल केले. त्यावेळी डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले.

 

Web Title: Karjat: The death of brother-in-law and brother-in-law, due to a shock, is death