वांबोरीमध्ये महावितरण विरोधात कंदील मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 17:56 IST2017-10-10T17:56:37+5:302017-10-10T17:56:44+5:30
अनियमित वीज पुरवठ्याला त्रस्त होऊन वांबोरी मधील शेतकरी, ग्रामस्थ आणि व्यापारी यांनी कंदील मोर्चा काढून भाजप सरकार तसेच विद्युत वितरण कंपनीचा निषेध केला.

वांबोरीमध्ये महावितरण विरोधात कंदील मोर्चा
राहुरी(अहमदनगर) : अनियमित वीज पुरवठ्याला त्रस्त होऊन वांबोरी मधील शेतकरी, ग्रामस्थ आणि व्यापारी यांनी कंदील मोर्चा काढून भाजप सरकार तसेच विद्युत वितरण कंपनीचा निषेध केला.
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाबासाहेब भिटे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. मार्केट यार्ड ते सब-स्टेशन वांबोरी पर्यंत काढण्यात आले. भारनियमन वेळेत बदल करावा. २४ तास सिंगल फेज व शेतीसाठी १२ तास वीज मिळावा. दिवाळी पूर्वी वीजपुरवठा सुरळीत करावा. पूर्ण दाबाने शेतीसाठी वीजपुरवठा सुरू न केल्यास उग्र आंदोलन छेडण्याचाही इशारा भिटे यांनी दिला. महावितरण अधिकार्यांना कंदील भेट देण्यात आला. याप्रसंगी किसान जवरे, संभाजी मोरे, गोरक्षनाथ वेताळ, नितीन बाफना, हरी वेताळ, संतोष पटारे, रवी पटारे, संजय मुथा, संतोष घुगरकर, जुबेर शेक, शिवाजी नाटक आदीसह व्यापारी शेतकरी संख्येने उपस्थित होते.